Gazetted Officer Non Gazetted। राज्यातील 74 राजपत्रित-अराजपत्रित नायब तहसीलदारांना तहसीलदारपदी पदोन्नती
पुणे : राज्य शासनाच्या महसूल विभागाने नुकतेच आपल्या विभागातील 74 राजपत्रित – अराजपत्रित (gazette of non gazetted) नायब तहसीलदारांना तहसीलदारपदी पदोन्नती देऊन त्यांची बदली केली आहे. मात्र, राजपत्रित – अराजपत्रित (gazette of non gazetted) या मध्ये नेमका काय फरक ते जाणून घेणे महत्वाचे आहे. (Promotion of 74 gazetted – non-gazetted deputy tehsildars to the post of tehsildars in the state)
केंद्र आणि राज्य शासनाने आकृतिबंधानुसार अधिकारकक्षा निश्चित केलेले आहे. त्यानुसारच अधिकाऱ्यांचीअधिसूचना जारी करत अधिसूचना राजपत्रात (Gazette) प्रसिद्ध केली जाते. सामान्य लोकांच्या अधिकृत माहितीकरिता आणि कायद्याने ही अधिसूचना जारी केली जाते. राज्य शासनाने राजपत्राद्वारे घोषित केलेली अशी अधिकार पदे मग राजपत्रित (GAZETTED OFFICER) म्हणून संबोधली जातात. अन्य अधिकार पदे ही वेतनमान जास्त असले किंवा कामाचे स्वरूप मोठे वाटत असले तरी अराजपत्रित म्हणून गणली जातात. राजपत्रित असणे याचा अर्थ फक्त अधिकार असा होत नाही तर अधिकारासोबत जबाबदाऱ्या पण असतात. राजपत्रित व अराजपत्रीत अधिकाऱ्यांमधील फरक (Difference between gazetted and non-gazetted officers)
राजपत्रित अधिकारी (Gazetted Officer) यांना स्वत:चा शिक्का असतो. केंद्रीय राजपत्रित अधिकारी हे राष्ट्रपतींच्या अनुमतीने तर राज्य स्तरीय राजपत्रित अधिकारी राज्यपालांच्या (Governor) अनुमतीने नियुक्त होतात. म्हणजे राजपत्रित अधिकारी यांना फक्त नियुक्ती करणारी अथॉरिटी हटवू शकते. (उदा. राष्ट्रपती, राज्यपाल), यामध्ये गट अ आणि काही गट ब दर्जाचे अधिकारी असतात. केंद्रीय राजपत्रित अधिकारी (IAS, IPS, IFS, IRS, etc) राज्यस्तरीय राजपत्रित अधिकारी (Dy. Collector, DySp, Tahsildar, Dy. CEO, etc) यांचा समावेश आहे. अराजपत्रित अधिकाऱ्यांना स्वत चा शिक्का नसतो. यांची संबंधित संस्थेचे प्रमुखामार्फत नियुक्ती होते. यामध्ये काही गट ब आणि गट क अधिकारी येतात. राज्यस्तर अधिकारी (PSI, STI, ASO, TAX ASST, CLERK, etc..) यांचा समावेश असतो. (difference between gazetted and non gazetted officer in marathi)