पुणे Pune crime : पुणे शहरात मुली व महिला सुरक्षित नसल्याची बाब पुन्हा एकदा समोर आली आहे. वानवडी परिसरातील एका 14 वर्षीय मुलीवर आठ जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यातील आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. (Gang rape of a minor girl in Pune)
गेल्या आठवड्यात जनता वसाहतीमध्ये एक 25 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्काराची घटना ताजी असतानाच पुन्हा एक घटना समोर आली आहे. पुणे रेल्वे स्टेशन परिसरातुन रिक्षातून अपहरण करुन एका अल्पवयीन मुलींवर सामुहिक बलात्कार केल्याची संतापज8 घटना समोर आली आहे. मुलगी एका ठिकाणी थांबली असताना रिक्षातून आलेल्या आरोपींनी तिला रिक्षात बसवून अज्ञात ठिकाणी घेऊन गेले. त्यानंतर तिच्यावर आरोपींनी बलात्कार केला. (Gang rape of a minor girl in Pune)
याप्रकरणी वानवडी पोलिसांनी आठ जणांना अटक केली असून, इतर आरोपींचा शोध सुरू आहे. त्यामध्ये रेल्वेचे दोन कर्मचारी, रिक्षा चालक व इतर आरोपींचा सहभाग आहे. सर्वात गंभीर प्रकार म्हणजे तब्बल दोन दिवस मुलीवर नराधमांनी अत्याचार केले आहेत. पहिल्या दिवशी चौघांनी तर दुसर्या दिवसी पाच जणांनी तिच्यावर बलात्कार केल्याची माहिती समोर आली आहे. (Gang rape of a minor girl in Pune)
मशाक अब्दुलमजिद कान्याल (वय.27,रा. वैदुवाडी हडपसर),अकबर उमर शेख (वय.32, रा. मंगळवार पेठ जुना बाजार), रफिक मुर्तजा शेख (वय.32,रा.मंगळवार पेठ), अजरुद्दीन इस्लामुद्दीन अन्सारी (वय.27,रा. कासेवाडी), प्रशांत सॅम्युयल गायकवाड (वय.32,रा. ताडीवाला रोड), राजकुमार रामनगीना प्रसाद (वय.29,रा. घोरपडी गाव), मोईब नईम खान (वय.24,रा. बोपोडी), असिफ फिरोज पठाण (वय.36,रा. लोहीयानगर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.