पुणे मनपाच्या क्षेत्रिय कार्यालयांमध्ये बनावट मृत्यू दाखला देणारे रॅकेटचा पर्दाफाश

पुणे. पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून जन्म आणि मृत्यू दाखला (Birth and death certificates) दिले जातात. मृत्यूचे बनावट दाखले देणारी टोळी असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोकणातील श्रीवर्धन येथे पुणे महापालिकेकडून देण्यात आलेल्या खोट्या मृत्यू दाखल्याच्या आधारे एक एकर जमिन खरेदी –विक्री झाल्याचा प्रकार समोर आले आहे. याप्रकरणात रायगड जिल्ह्यातील दिघी पोलिसांनी धनकवडी क्षेत्रिय कार्यालयातील दोन डेटा ऑपरेटला ताब्यात घेतले आहे. तसेच मृत्यू दाखल्यासाठी देण्यात आलेल्या कागदपत्रे मागितली आहेत. मात्र, दाखल्यासाठी दिलेले कोणतेही कागदपत्र उपलब्ध नसल्याचे चौकशितून समोर आले आहे. (Gang of people issuing fake death certificate busted in Pune Municipal Corporation)