गान सम्राज्ञीला लता मंगेशकर यांना अखेरचा निरोप

मुंबई : भारतरत्न लता मंगेशकर यांच्यावर मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) उपस्थित लावत आदरांजली वाहिली. (Lata Mangeshkar)  दिदींना निरोप देण्यासाठी अनेक क्षेत्रातील दिग्गजांनी उपस्थिती लावली होती. (Funeral on Bharat Ratna Lata Mangeshkar)

 

Bharat Ratna Lata Mangeshkar passes away भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं निधन

 

 

यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray), शरद पवार (Sharad Pawar), अजित पवार, सुप्रिया सुळे (Ajit Pawar, Supriya Sule) असे मोठे नेतेही उपस्थित होते. त्याचबोरबर छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, सुभाष देसाई हे मंत्रीही अंत्यस्काराला आलेले होते. राज ठाकरेही परिवारासह उपस्थित होते. केंद्रीय मंत्री पियूष गोयल (Union Minister Piyush Goyal) यांनी हजेरी लावत आदरांजली वाहिली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Prime Minister Narendra Modi) बाजूला देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) बसले होते. मात्र मुख्यमंत्र्यांना बघताचं फडणवीस उठले आणि मुख्यमंत्र्यांना मोदी यांच्या शेजारी जागा दिली. (Funeral on Bharat Ratna Lata Mangeshkar)

 

 

 बॉलिवूडमधील अनेक दिग्गजांनीही आंदरांजली वाहण्यासाठी उपस्थिती लावली होती. यावेळी शाहरुख खान, जावेद अख्तर अशी अनेक मंडळी छत्रपती शिवजी पार्कवर दाखल झाल्याचे दिसून आले. यावेळी भारतरत्न सचिन तेंडूलकरही यांनीही हजेरी लावत आदरांजली वाहिली. राज्य सरकारने दुखवटा जाहीर केला आहे. त्यानिमित्ताने उद्या सोमवार 7 फेब्रुवारी रोजी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. केंद्र सरकारपाठोपाठ राज्य सरकारनेही राजकीय दुखवटा जाहीर केल्याने दोन दिवस सर्व सरकारी कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. तसेच मंत्रालयावरील तिरंगा झेंडा अर्ध्यावर उतरवण्यात आला आहे. तसेच संसदेसह देशभरातील विधानसभा, मंत्रालये, सचिवालये आणि सरकारी कार्यालयांवरील तिरंगा अर्ध्यावर उतरवण्यात आला आहे. (Funeral on Bharat Ratna Lata Mangeshkar)
Local ad 1