pune ring road news 2023 : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) प्रस्तावित असलेल्या रिंगरोडसाठी (वर्तुळाकार रस्ता) जिल्हा प्रशासनाकडून भूसंपादन केले जात आहे. पश्चिम मार्गाचे भूसंपादन मार्गी लागले असून, आता पूर्व मार्गाचे भूसंपादन सुरू केले जाणार आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाकडे निधीची मागणी केली आहे. त्यानुसार या रस्त्याच्या भूसंपादनासाठी लागणारा निधी तात्काळ उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी बुधवारी दिली. त्यामुळे आता पूर्व मार्गाचे भूसंपादनही सुरू होणार आहे. (Funds for Pune Ring Road will be made available immediately: Ajit Pawar)
मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या प्रकल्प संनियंत्रण कक्षाच्या (प्रोजेक्ट मॉनिटरिंग युनिटच्या) बैठकीत उपमुख्यमंत्री पवार बोलत होते.