पुणे : मुस्लिम धर्मियांसाठी पवित्र असलेल्या रमजान महिन्याच्या उपवासाच्या कालावधीत हॉस्पिटलमध्ये उपचार घेणारे पेशंट व त्यांच्या नातेवाईकांसाठी दररोज सायंकाळी इफ्तारी भोजनाची मोफत व्यवस्था रशीद शेख फाउंडेशन , नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटी व युनिक फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने या सामाजिक संस्थांकडून करण्यात आलेली आहे. (Free arrangement of Iftari for patients)
Related Posts
शहरातील ससून हॉस्पिटल , कमला नेहरू हॉस्पिटल , सोनवणे हॉस्पिटल , राजीव गांधी हॉस्पिटल , औंध हॉस्पिटल यासह अन्य शासकीय हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल असलेल्या व्यक्तींची व त्यांच्या नातेवाईकांची इफ्तारी भोजनाची व्यवस्था नसल्याने त्यांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे ही बाब लक्षात घेऊन पुणे येथील रशीद शेख फाउंडेशन , नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटी व युनिक फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या दिनांक 2 मार्च ते रमजान ईद च्या दिवसापर्यंत सायंकाळच्या वेळेला इफ्तारी भोजन पेशंटल व त्याच्यासोबत असलेल्या नातेवाईकांना देण्यात येणार आहे. तसेच यावेळी गरजू असलेल्या धर्मीय व्यक्तींना देखिल मागणीनुसार करण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते रशिद शेख, राहुल डंबाळे, खिसाल जाफरी यांचेवतीने यावेळी देण्यात आली.
दरम्यान हॉस्पिटलमधे उपचारार्थ दाखल असणाऱ्या पेशंट व त्यांच्या नातेवाईकांना इफ्तारी भोजनाची व्यवस्था केली आहे याची माहिती व्हावी यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावा व यासाठी 9890999955 / 8767794966 या नंबरवर संपर्क करावा असे अवाहन देखिल यावेळी करण्यात आलेली आहे.