(High quality liquor) आयटी कर्मचार्यांना उच्च प्रतीची दारु घर पोहोच पुरवणारा अडकला जाळ्यात
पुणे ः कॉल सेंटरमधील कर्मचार्यांना ने-आण करणार्या चार चाकी वाहनातून उच्च प्रतिची दारु (high quality liquor) आयटीतील कर्मचार्यांना घरपोहोच देण्यासाठी आलेला विक्रम दिनेश वाघेला (वय-26, रा. कांदीवली इंस्ट मुंबई) हा उत्पादन शुल्क विभागाच्या जाळ्यात साडे दहा लाखांच्या मुद्देमालासह अडकला. वाघेला हा गेल्या आठ महिन्यांपासून पुण्याील आयटी कर्मचार्यांना उच्च प्रतीची दारु घरपोच पुरवत होता.
Vikram Dinesh Waghela (26, resident of Kandivali Inst, Mumbai), who came from a four-wheeler transporting high quality liquor to the IT staff, was caught in the excise department’s net with an issue of Rs 10.5 lakh. Waghela has been supplying high quality liquor to IT workers in Pune for the last eight months.
गेल्या काही दिवसांपासून वाघेला हा पुण्यातील आयटी कर्मचार्यांना उच्च प्रतीची स्कॅच घरपोहोच देत होता. याची माहिती उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथक क्रमांक एक च्या अधिकार्यांना लागली होती. वाघेला हा मद्यसाठ्यासह कात्रज परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार कात्रच चौकात सापळा लावण्यात आला होता. एम.एच. 03 सी. व्ही. 1742 या वाहनाला थांबवून चौकशी केली. परंतु चालकांने उडवा उडवीचे उत्तरे दिले. मात्र, अधिकार्यांचा संशय बळावला. त्यामुळे वाहनाची झडती घेतली असता, त्यामध्ये विविध ब्रॅन्डचे उच्च प्रतीच्या (high quality liquor) बनावट स्कॅच 1 लीटर क्षमतेच्या 90 बाटल्या मिळून आल्या. तसेच सात लाख किंमतीचे वाहन व मोबाईल जप्त करण्यात आला.
For the past few days, Waghela has been bringing high quality liquor to IT workers in Pune. Officers from Bharari Squad No. 1 of Excise Department got information that he would come to Katraj area with liquor. Accordingly, a trap was set in Katrach Chowk. M.H. 03c. V. 1742 stopped the vehicle and inquired. But the driver did not answer satisfactorily. This aroused the suspicion of the authorities. A search of the vehicle turned up 90 bottles of high quality counterfeit liquor of various brands with a capacity of 1 liter. Vehicles and mobiles worth Rs 7 lakh were also seized.