Accident । पेठशिवणी येथील अपघातात चार जण ठार
नांदेड : क्रुझर आणि कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात चार जण ठार झाले. ही घटना 26 डिसेंबर रोजी दुपारी 4 वाजता पालम ते लोहा राष्ट्रीय महामार्गावरील पेठशिवनी येथे घडली आहे. (Four killed in accident at Pethashivani on Loha-Palam road)
Suicide। धक्कादायक ! नांदेडमध्ये बस वाहकाने गळफास घेऊन केली आत्महत्या
अपघातात नांदेड सिडको परिसरातील लक्ष्मीकांत देविदासराव जहागीरदार (वय 76), शांताबाई लक्ष्मीकांत जहागीरदार (वय-७०) आणि अनिल लक्ष्मीकांत जहागीरदार (वय 56) आणि विलास साळवे (वय-५०) यांचा मृत्यू झाला आहे. (Four killed in accident at Pethashivani on Loha-Palam road)
मुंबईत ओमायक्रोनचे आढळले ’इतके’ रुग्ण
पालमकडून लोह्याकडे एमएच – 04 इटी – 2734 क्रमांकाच्या कारने जात होती. तर लोह्याकडून पालमकडे येणारी एमएच – 22 एमएच – 6333 क्रमांकाची क्रूजर प्रवासी घेऊन येत होती. दरम्यान, पेठशिवणी परिसरात या दोन्ही गाड्यांची भरधाव वेगात समोरासमोर धडक झाली. या अपघातात कारमधील चार पैकी तिघे ठार झाली आहेत. (Four killed in accident at Pethashivani on Loha-Palam road)
ओमायक्रॉनचा धोका : पुणे शहरासह जिल्ह्यात निर्बंधात वाढ
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पालम पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप काकडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल बाहत्तरे, फौजदार विनोद साने यांच्यासह आदी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी प्रवासाच्या मदतीने जखमींना वाहनाबाहेर काढले जात होते. कारचा अक्षरश: चेंदामेंदा झाल्याने मयतांना वाहनाबाहेर काढणे ही कठीण झाले होते. (Four killed in accident at Pethashivani on Loha-Palam road)