पुणे : पर्वती विधानसभा मतदारसंघ निवडणुकीकरिता उमेदवारांनी २२ अर्ज दाखल केले आहेत. त्यातील २० नामनिर्देशन पत्र वैध ठरली आहेत. ४ नोव्हेंबर २०२४ रोजी अर्ज मागे घेता येईल. मतदान २० नोव्हेंबरला होत असून २३ नोव्हेंबर २०२४ रोजी मतमोजणी होणार आहे. पर्वती विधानसभा मतदार संघासाठी दाखल झालेल्या अर्जामध्ये यंदाच्या विधानसभा निवडणुकीत अश्विनी नावाचे चार उमेदवार असल्याचे समोर आले आहे. (Four candidates of the same name in Parvati Vidhan Sabha Constituency)
Assembly Election Voting । 12 पैकी कोणताही एक पुरावा असेल तरच करता येईल
महाविकास आघाडीच्या उमेदवार अश्विनी नितीन कदम (Mahavikas Aghadi candidate Ashwini Nitin Kadam) म्हणाल्या, पर्वती मतदारसंघातील जनता सुज्ञ आणि चाणक्ष असल्याने असला रडीचा डाव ते हाणून पडणार यात शंका नाही. तरीही, निवडणूक आयोगाकडून मतदारांना सावधानतेने मतदान करण्याचा सल्ला देण्यात यावा अथवा वेगळा काही उपया करता येईल, जेणेकरून एकसारख्या नावामुळे कोणताही गोंधळ होणार नाही. याची काळजी घ्यावी. मतदारांनी मतदान करताना नीट लक्ष देऊन उमेदवाराचे पूर्ण नाव, पक्ष, व चिन्ह तपासून मतदान करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.