Donald Trump arrested : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प न्यूयॉर्कमधील मैनहैटन कोर्टात हजर झाले. त्यावेळी त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. न्यूयॉर्क ग्रँड ज्युरीने ट्रम्प यांच्यावर ऑडल्ट स्टार प्रकरणात फौजदारी खटला चालवण्यास मान्यता दिली आहे ट्रम्प यांच्या अटकने एकच खळबळ उडाली आहे. (Former US President Donald Trump arrested)
ट्रम्प हे अमेरिकेच्या इतिहासातील पहिले राष्ट्राध्यक्ष बनले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फसवणुकीच्या 30 पेक्षा जास्त गुन्ह्यांचा आरोप आहे. यातील सर्वात गंभीर आरोप म्हणजे पॉर्न अभिनेत्री स्टॉर्मी डॅनियल्सला पैसे दिल्याचा आरोप आहे. (Former US President Donald Trump arrested)
2016 च्या अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणूक प्रचारात आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर आरोप ठेवण्यात आला आहे. हे प्रकरण पॉर्न स्टारशी संबंधित आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचे पॉर्न स्टार असलेल्या स्टॉर्मी डॅनियल्ससोबत अफेअर असल्याचा आरोप आहे आणि ही माहिती लपवण्यासाठी त्यांनी 2016 मध्ये डॅनियल्सला 1,30,000 डॉलर दिल्याचा आरोप आहे. (Former US President Donald Trump arrested)