...

पुण्यात वास्तव्यास असलेल्या कंधार – लोहाकरांसाठी माजी खासदार प्रताप पाटिल चिखलीकरांचा रविवारी स्नेहसंवाद मेळावा

पिंपरी : उद्योग ,व्यवसाय, नोकरी आणि कामानिमित्त कंधार – लोहा विधानसभा मतदारसंघातील नागरिक पुणे येथे वास्तव्यास आहेत अशा सर्व नागरिक, मतदारांशी संवाद साधण्यासाठी माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या वतीने स्नेहसंवाद मिळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. (Former MP Pratap Patil Chikhlikar’s love gathering in Pune)

 

रविवारी  सकाळी 11 वाजता चंद्रफुल गार्डन आळंदी रोड चऱ्होली  येथे आयोजित करण्यात आलेल्या स्नेहसंवाद मेळाव्यास भोसरी विधानसभेचे आ. महेश लांडगे , राज्यसभेच्या सदस्या डॉ. मेधा कुलकर्णी,  विधान परिषदेच्या सदस्या उमा खापरे ,आमदार अमित गोरखे,  आ. अश्विनी जगताप , खडकवासलाचे आ. भीमराव तापकीर , माजी आमदार जगदीश मुळीक , पुणे भाजपा शहराध्यक्ष धीरज घाटे , पिंपरी-चिंचवड भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप , माजी महापौ नितीन काळजे यांच्यासह अनेकांची उपस्थिती राहणार आहे.

 

 आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने लोहा – कंधार विधानसभा मतदारसंघातील जे मतदार आणि नागरिक पुणे येथे कामानिमित्त वास्तव्यास आहेत या सर्व नागरिकांशी हितगुज करून संवाद साधला जाणार आहे. आयोजित स्नेह संवाद सोहळ्याला लोहा आणि कंधार तालुक्यातील आणि मतदारसंघातील पुणे येथील वास्तव्यास असलेल्या नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर मित्र मंडळ पुणे यांच्या वतीने करण्यात आले आहे.

 

Local ad 1