माजी खासदार चिखलीकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
लोहा विधानसभा मतदार संघातून उमेदवारी जाहीर
नांदेड । लोहा विधानसभा मतदार संघातून महायुतीचा उमेदवार कोण असणार देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी विधानसभा निवडणूक लढवणार असून, लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. त्यामुळे लोहा विधानसभा मतदार संघ महायुतीमध्ये भाजप, शिवसेना (शिंदे) की राष्ट्रवादी काँग्रेस (अजीत पवार) पक्षाला सुटणार याकडे लक्ष लागले होते. अखेर लोहा विधानसभेसाठी महायुतीने आपला उमेदवार जाहीर केला आहे. हा मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याल गेला असून, भाजपचे माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर (Pratap Patil Chikhalikar)घड्याळ चिंन्हावर राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक रिंगणात उतरले आहेत. कारण राष्ट्रवादी काँग्रेसने जाहिर केलेल्या उमेदवारांच्या यादीमध्ये त्यांचे नाव समाविष्ट करण्यात आले आहे. महाविकास आघाडीमध्ये हा मतदार संघ शिवसेना (उबाठा) यांच्या वाट्याला गेला असून, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी स्थायी समितीचे आध्यक्ष एकनाथ पवार यांना उमेगदवारी जाहिर करण्यात आली आहे. त्यामुळे चिखलीकर विरुद्ध पवार असा सामना लोह्यात रंगणार आहे. (Former MP Chikhlikar joins NCP; Candidates announced from Loha Vidhan Sabha Constituency)
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने 44 उमेदवारांची पहिली यादी केली जाहीर
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाने विधानसभा निवडणुकीसाठी आपली दुसरी यादी आज जाहीर केली आहे. विशेष म्हणजे आजच पाच जणांना पक्षात प्रवेश देऊन लगेचच त्यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. तसेच गेल्या काही दिवसांपासून नवाब मलिक यांच्या उमेदवारीबाबत काय निर्णय होणार? याची चर्चा होती. त्यावरूनही आता पडदा उठला आहे. नवाब मलिक यांची मुलगी सना मलिक हीला अणुशक्ती नगर विधानसभेसाठी तिकीट जाहीर झाले आहे. तर झिशान सिद्दिकालाही आज पक्षप्रवेश देऊन वांद्रे पूर्व येथून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. अजित पवार गटात आज झिशान सिद्दिकी, निशिकांत पाटील, संजयकाका पाटील, सना मलिक आणि प्रताप पाटील चिखलीकर (Former MP Chikhlikar joins NCP) यांना पक्षप्रवेश देण्यात आला. पक्षप्रवेश होताच त्यांना उमेदवारीही जाहीर करण्यात आली.
पुर्वाश्रमीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मध्यंतरी दोन टर्म भाजपाकडून सांगलीचे खासदार राहिलेल्या संजय काका पाटील यांनी आज पक्षप्रवेश घेताच त्यांना तासगाव – कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली गेली आहे. ते दिवंगत आर. आर. पाटील यांचे पारंपरिक विरोधक मानले जातात. या मतदासंघात आर. आर. पाटील यांचा मुलगा रोहित पाटीलशी त्यांचा सामना होणार आहे. रोहित पाटील अवघ्या २५ वर्षांचा असून त्याची ही पहिलीच निवडणूक आहे. तसेच भाजपाचे माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनीही राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात प्रवेश केला आहे. तसेच नवाब मलिक यांच्या मुलीलाही उमेदवारी दिली गेली आहे. दाऊदशी संबंधित व्यक्तीशी जमिनीचे व्यवहार केल्यामुळे नवाब मलिक ईडीच्या कारागृहात होते. त्यांची जामिनावर सुटका झालेली आहे. भाजपाने त्यांना याआधीही कडाडून विरोध केला होता. त्यांच्याजागी मुलीला उमेदवारी देण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने जाहिर केलेली उमेदवांरीची यादी
पुणे पोर्शे पघात प्रकरणातील सुनील टिंगरेंना उमेदवारी
पुणे पोर्श अपघात प्रकरणात राष्ट्रवादीचे आमदार सुनील टिंगरे यांचे नाव घेतले गेले होते. त्यांनी अपघाताच्या दिवशी पोलीस ठाणे गाठून अल्पवयीन आरोपीला सोडविण्यासाठी मदत केल्याचा आरोप केला गेला. मध्यंतरी बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी वडगाव शेरीमध्ये आक्रमक प्रचार करत दोन जीव घेणाऱ्यांना मदत करणाऱ्यांना निवडणुकीत पाडा, असा थेट हल्ला टिंगरेंवर केला होता. (Former MP Chikhlikar joins NCP)