पुण्यात भाजपला मोठा झटका ; माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या NCP शरदचंद्र पवार पक्षात प्रवेशाचा दिवस ठरला !

पुणे । भाजपमधील नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील  (Harshvardhan Patil) यांनी शुक्रवारी भाजपला रामराम करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात (NCP Sharad Chandra Pawar Party) प्रवेश करण्याची घोषणा केली. इंदापूरमध्ये आपल्या कार्यकर्त्यांसमवेत बैठक घेऊन त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. या मेळाव्यापूर्वीच त्यांचा मुलगा आणि कन्या या दोघांनीही तुतारीचे स्टेटस ठेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील प्रवेशाचे संकेत दिले होते. त्यानंतर, आजच्या मेळाव्यात त्यांनी कार्यकर्त्यांची भूमिका जाणून घेत आपली भूमिकाही स्पष्ट केली. (Former minister Harshvardhan Patil’s blow to BJP; Will join Sharad Pawar’s NCP)

 

 

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (NCP state president Jayant Patil) यांनी हर्षवर्धन पाटील यांचे पक्षात स्वागत केले आहे. तसेच, त्यांच्या पक्षप्रवेशाची तारीखही जाहीर केली. त्यामुळे, हर्षवर्धन पाटील यांच्या तुतारी हाती घेण्याच्या तारखेवरही आता शिक्कामोर्तब झाले आहे. मात्र, या निर्णयानंतर इंदापुरात पुन्हा बॅनर झळकू लागले आहेत. शरद पवार यांच्या भूमिकेवरच आता काहींनी प्रश्न उपस्थित केल्याचेही पाहायला मिळाले.

 

https://x.com/Jayant_R_Patil/status/1842204238765555946?t=ybOBzO1rD2LW8jyVtJ-mGw&s=08

 

 

हर्षवर्धन पाटील यांनी कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला त्यावेळी कोणता निर्णय घ्यायचा याबाबत प्रश्न त्यांनी कार्यकर्त्यांना केले, त्यावेळी जमलेल्या कार्यकर्त्यांनी त्यांना तुतारी फुंकण्यासाठी समर्थन दिले. यावेळी बोलताना हर्षवर्धन पाटील यांनी हा निर्णय घेण्याआधी आपण भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांना भेटून त्यांच्याशी चर्चा केल्याची माहिती दिली आहे. तसेच, मी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतला. माझ प्रवेश कधी होईल? हे माझ्या हातात नाही, असेही हर्षवर्धन पाटील यांनी म्हटले होते. आता, राष्ट्रवादी काँग्रेसकडून ह्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले आहे.

 

”राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षात येण्याचा निर्णय घेतला, त्यांचे मी मनापासून स्वागत करतो. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत इंदापूर येथे सोमवार 7 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 10 वाजता त्यांचा पक्षप्रवेश होईल,” अशी माहिती प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सोशल मिडियावरुन दिली.

 

पक्षप्रवेशाविरुद्ध इंदापुरात झळकले बॅनर

पवार साहेबांनी इंदापूर तालुक्यात जो निर्णय घेतला, तो म्हणजे तोंड दाबून बुक्क्यांचा मार अशी अवस्था तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांची झालेले आहे, असा आशयाचा बॅनर झळकला आहे. इंदापुरातील दोघांनाही जनता कंटाळले होती. माझा राजा असा नव्हता अशा प्रकारचे सोशल मीडियावर बॅनर व्हायरल करून राष्ट्रवादीचा कार्यकर्त्यांकडून हर्षवर्धन पाटलांसमोर आव्हाने निर्माण करण्यात येत असल्याचेही पाहायला मिळत आहे. त्यामुळे, इंदापूरचे राजकारण सध्या राज्यभर चर्चेत आहे.

Local ad 1