पुणे, पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीचा आलेख चढत जात असून, शहरातील प्रसिद्ध असलेल्या प्रभात रस्त्यावर मोठी घटना उघडकीस आली आहे. पुणे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार भारतीय संघातील माजी क्रिकेटपटू सलील अंकोला यांच्या आई माला अशोल अंकोला (वय ७८) यांचा राहत्या घरात संशयास्पद मृतदेह आढळून आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. शुक्रवारी दुपारी त्यांचा मृतदेह घरातील बेडवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला. त्यांच्या गळ्यावर व्रण (चिरलेला) होता. याप्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आला आहे. (Former cricketer Salil Ankola’s mother’s body was found lying in a pool of blood)
Related Posts
मिळालेल्या माहितीनुसार, माला अंकोला या मुलगी कविता जाचक यांच्याकडे प्रभात रस्त्यावरील सुंदरराव रेगे पथ येथील एका सोसायटीत राहत होत्या. दरम्यान त्यांचा मुलगा सलील अंकोला हे मुंबईत राहत होते. दरम्यान, शुक्रवारी सकाळच्या सुमारास घरात काम करणारी महिला आली होती. तिने बेल वाजवली. पण, दरवाजा उघडला गेला नाही. यामुळे अर्धातास तिथेच थांबून होत्या. परंतु, बराचवेळ दरवाजा उघडत नसल्याने कामगार महिलेने त्यांची मुलगी कविता जाचक यांना माहिती दिली.
त्यानंतर मुलीने त्यांचा जुना कामगार असलेल्या एका व्यक्तीला ही माहिती दिली. तो कविता यांच्या एका नातेवाईकांकडुन चावी घेऊन घरी आले. तेव्हा त्यांनी त्यांच्याकडील चाविणे दरवाजा उघडला. तेव्हा सोसायटीचा सुरक्षा रक्षक, घर कामगार महिला आणि त्या व्यक्ती आत जाऊन पाहिले असता बेडवर माला या रक्ताच्या थरोळात पडलेल्या दिसून आले. त्यांच्या गळ्यावर चाकूने वार केल्याची जखम दिसून आली. तेव्हा तिघेही घराबरले. ही माहिती त्यांनी कविता यांना दिली. कविता याही घरी आलेल्या. त्यांनी माला यांना जवळच्या खासगी रुग्णालयात नेले. पण, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले होते. नंतर हा प्रकार डेक्कन पोलिसांना कळविण्यात आला. मृतदेह संशयास्पद आढलल्याने तात्काळ पोलिसांनी मृतदेह ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. शवविच्छेदन झाल्यानंतर नेमकी आत्महत्या की खून हे स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.