(One lakh) संगमनेर उपविभागीय वन अधिकारी लाखाची लाच घेताना जाळ्यात
अहमदनगर : गावातील पूर्वी वनक्षेत्रात येत असलेली शेतजमीन ही निर्वनीकरणाचा अहवाल देण्यासाठी एक लाख रुपयांची लाच स्विकारणारा संगमनेरचा उपविभागीय वन अधिकारी विशाल बोऱ्हाडे हा लाचलुचपत विभागाच्या सापळ्यात अलगद सापडला आहे. बोऱ्हाडेला आळेफाटा (ता. जुन्नर) येथून अटक करण्यात आली. Sangamner Sub-Divisional Forest Range Officer arrested for accepting bribe of Rs one lakh
डोळासने (ता. संगमनेर, जि. अहमदनगर) गावातील पूर्वी वनक्षेत्रात येत असलेली शेतजमीन ही निर्वनीकरण झाल्याबाबतचा अभिप्राय असलेला अहवाल जिल्हाधिकारी यांनी मागितला हाेता. ताे अहवाल देण्यासाठी बोऱ्हाडे यांनी अर्जदाराकडे एक लाख रुपयांची मागणी केली होती. Sangamner Sub-Divisional Forest Range Officer arrested for accepting bribe of Rs one lakh