(forest officer deepali chavan) लोकांचा कायद्यावर विश्वास बसेल असा धडा शिकवा…

मुंबई : (forest officer deepali chavan) महाराष्ट्र हा जिजाऊॅचा आहे. गुन्हेगार आणि त्याला वाचवायचा प्रयत्न करणाऱ्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे. राज्यातील पोलिसांना, लोक कायदा हातात घ्यायची भाषा करत आहेत. लोकांचा कायद्यावर विश्वास बसेल असा धडा शिकवा, अशी मागणी महिला व बालविकास मंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्री उध्दव बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेऊन केली.  (Adv.Yashomati Thakur

मेळघाटातील वनपरिक्षेत्र अधिकारी दिपाली चव्हाण (forest officer deepali chavan) आत्महत्या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी वनाधिकारी रेड्डी यांच्यावर निलंबनाची कारवाई व्हावी यासाठी महिला व बालविकास मंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्री उध्दव बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी मुख्यमंत्र्यांनी या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून कडक कारवाईचे आदेश दिले आहेत.  (Adv. Yashomati Thakur

ऍड. यशोमती ठाकूर म्हणाल्या, राज्यातल्या आयाबहिणींना त्रास देणाऱ्या रोड रोमीयो बरोबरच सरकारी तसेच खाजगी कार्यालयांमध्ये लैंगिक शोषण करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना चांगला धडा शिकवण्याची वेळ आहे. या राज्यात अशा गुन्ह्यांना आणि गुन्हेगारांना माफी नाही. सगळ्यांना शिक्षा मिळेल, कडक शिक्षा मिळेल. सगळ्या कार्यालयांमधल्या विशाखा समित्यांचा आढावा आम्ही घेणार आहोत. एकाही गुन्हेगाराला सोडणार नाही. असे त्या म्हणाल्या. ((forest officer deepali chavan)

forest officer deepali chavan)
forest officer deepali chavan)

Local ad 1