नांदेड : माणसाचा मृत्यू होतो, त्याची शेवटची जागा म्हणजे स्मशानभूमी. परंतु मृत्यूनंतरही स्मशानभूमीसाठी जागा नसल्याने नदी-नाले किंवा तलावत अंत्यस्कार करावे लागते. स्मशानभूमीसाठी जागा नसलेल्या गावांची संख्या सुमारे 300 आहे. त्यापैकी आता 91 गावांना जागा देण्यात आली आहे. तर उर्वरित गावांत अजूनही प्रतिक्षाच करावी लागणार आहे. (There is no space for a cemetery in 300 villages in Nanded district)
जिल्ह्यातील अर्धापूर, उमरी, कंधार, किनवट, देगलूर, धर्माबाद, नांदेड, बिलोली, भोकर, माहूर, मुखेड, मुदखेड, हदगाव या तालुक्यामध्ये स्मशानभूमी नसलेल्या खेड्याची संख्या लक्षणीय आहे. पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दिलेल्या निर्देशानुसार गत सहा महिन्यापासून जिल्हा परिषद आणि जिल्हा प्रशासनातर्फे प्रशासकीय स्तरावर आवश्यक असलेली मंजुरी व प्रक्रीया पुर्ण करण्यात आली. जवळपास 91 खेड्यांचा स्मशानभूमीचा प्रश्न आता मार्गी लागला आहे. (There is no space for a cemetery in 300 villages in Nanded district)
Related Posts
https://www.mhtimes.in Read Marathi News In Maharashtra At Your Finger Tips.