कंधार Kandhar News : नांदेड जिल्ह्यात 6 व 7 सप्टेंबर रोजी झालेल्या ढगफुटीमुळे शेतीसह खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले. यात नदी-नाल्यांच्या कडेला असलेली शेती खरडून गेली आहे. त्या शेतकर्यांना विशेष आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी कौठा, शिरूर, जाकापूर व तेलुर येथील शेतकर्यांनी कंधारचे तहसिलदार यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. (Floods have eroded agriculture, prompting farmers to seek financial help)
कंधार तालुक्यातून मन्याड नदी (Manyad river) जाते. या नदीकाठच्या शेतकर्यांना पिक घरात येईल, याची शाश्वती नसते. कारण, मानार प्रकल्प भरला की, नदीत पाणी सोडले जाते. त्यामुळे नदीकाठची शेती खरडून जाते. मागील तीन वर्षांपासुन हाताला आलेल्या पिकांसोबत माती खरडून जात आहे. नदीचे पात्र सपाट झाल्याने पूराचे पाणी शेतात शिरत आहे. या शेतकर्यांना दरवर्षी शेतीचे प्रचंड नुकसान होत असून, परिणामी शेतकरी कर्ज बाजारी होत आहेत. (Floods have eroded agriculture, prompting farmers to seek financial help)
शासन निर्णयानुसार नुकसान भरपाई मिळणारी ही अत्यअल्प असून, नदी-नाल्या काटच्या शेतकर्यांना शासनाने शेतात माती टाकण्यासाठी विशेष अर्थसाह्य करावे, मातीसह पिकाचे शभंर टक्के नुकसान झाले असून, शभंर टक्के पिक विमा मंजूर करावा, अशी मागणी शेतकर्यांनी केली आहे.
यावेळी कंधार पंचायत समितीचे सदस्य सत्यनारायण माणसपुरे, राजेश पावडे, उपसरपंच गंगाधर हात्ते, बालाजी देशमुख, विश्वनाथ देशमुख, पप्पू चोपवाड, कपिल देशमुख, गंगाधर वाघमारे, शंकर पावडे, सुधीर देशमुख, नामदेव इंदोरे, शिवराम देशमुख, रामेश्वर इंदोरे, मारोती कामोले, प्रभाकर पांडे, दत्ता पानचावरे, रामण कामोले, सदाशिव तेलंगे, महाजन पालिमकरसह शेतकरी उपस्थित होते. (Floods have eroded agriculture, prompting farmers to seek financial help)