गुजरातमधील रिक्षा चालकाच्या नावाने असलेल्या पुण्यातील कंपनीने पाच ते आठ हजार कोटींचा केला जीएसटी घोटाळा

पुणे, मुंबई, राजकोट, भावनगरमध्ये छापेमारी

GST Pune पुणे : गुजरातमधील भावनगर येथील एका 50 वर्षिय रिक्षा चालकाने वस्तू व सेवा कर अर्थात जीएसटी विभागाला थोडा बहुत नाही तर 5 ते 8 हजार कोटींचा चुना लावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बनावट कंपनीच्या नावे कागदपत्रे सादर करून पाच ते आठ हजार कोटी रुपयांचा वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) कर चुकविला आहे. वस्तू आणि सेवा कर विभागाच्या पुणे कार्यालयाने हा धक्कादयाक प्रकार उघडकीस आणला आहे. या प्रकरणात कोरेगाव पार्क ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कर चुकवेगिरी प्रकरणाचा मुख्य सूत्रधार गुजरातमधील असल्याचे तपासात उघडकीस आले असून, त्याला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी आठजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Five to eight thousand crore GST scam)

 

 

जीएसटी पुणे विभागाच्या कार्यालयातील अधिकारी ऋषी प्रकाश (वय ३९) यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी अश्रफ इब्राहिम कालवाडिया (वय ५०, रा. अल्टीमेट रान्डेर रोड, सूरत, गुजरात), नितीन भागोजी बर्गे (रा. ओम साई गणेश सोसायटी, कामराजनगर, घाटकोपर, मुंबई), फैजल अब्दुल गफार मेवावाला (रा. बुर्ज अश्रफी, कांबेकर स्ट्रीट, मुंबई), निजामुद्दीन मोहम्मद सईद खान (रा. मराठी हायस्कूलच्या मागे, दिवा रस्ता, भिवंडी), अमित तेजबहाद्दुर सिंग (रा. सेंच्युरी रेयॉन कॉलनी, मुरबाद रोड, उल्हासनगर, मुंबई), राहुल बटुकभैय्या बरैय्या, कौशिक भूपतभाई मकवाना, जितेंद्र मुकेशभाई गोहेल यांच्यासह साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

ऑक्टोबर २०२३ मध्ये पठाण एंटरप्रायजेस खात्याची ऑनलाइन तपासणी करण्यात आली. तेव्हा पठाण एंटरप्रायजेसकडून कोणत्याही प्रकारची माल खरेदी आणि विक्री होत नसून, केवळ देयके तयार करण्यात आल्याची बाब चौकशीत उघड झाली. त्यानंतर जीएसटी पथकाने हडपसर भागातील शेवाळवाडी परिसरातील पठाण एंटरप्रायजेसचा शोध घेतला. तेव्हा जीएसटी नोंदणीसाठी दिलेला पत्ता बनावट असल्याचे आढळून आले. संबंधित कंपनी, आस्थापना पठाण शब्बीर खान अन्वर खान याच्या नावावर असल्याचे निदर्शास आले. खान गुजरातमधील भावनगर परिसरात वास्तव्यास असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर तपास पथक भावनगर परिसरात पोहोचले. तेव्हा पठाण रिक्षाचालक असल्याचे उघडकीस आले. पठाण एंटरप्रायजेसबाबत काहीही माहिती नसल्याचे त्याने सांगितले. (Five to eight thousand crore GST scam)

 

E- KYC Mandatory for Ration Card। रेशनकार्ड धारकांसाठी महत्वाची बातमी ; KYC करा अन्यथा धान्य मिळणे होईल बंद

 

त्यानंतर तपास पथकाने ऑनलाइन तपासणी केली. विश्लेषणात एकाच मोबाइल क्रमांक, ईमेल पत्त्यावर जीएसटी नोंदणीकृत असलेल्या कंपनी, तसेच आस्थापना आढळून आल्या. बँके खात्याचा शोध घेतला. तेव्हा खातेधारक जित कुकडीया सुरक्षारक्षक असल्याची माहिती मिळाली. संबंधित खाते कुकडिया याने त्याच्या ओळखीतील आरोपी कौशिक मकवाना आणि जितेंद्र गोहेल यांच्यासाठी उघडल्याची माहिती मिळाली.

पुणे, मुंबई, राजकोट, भावनगरमध्ये छापेमारी

जीएसटीच्या तपास पथकाने पुणे, मुंबई, तसेच गुजरातमधील राजकोट, भावनगर परिसरात कारवाई केली. पठाण एंटरप्रायजेस आणि इतर बनावट नावाने अश्रफ कालावाडिया चालवित असल्याची माहिती तपासात मिळाली. पथकाने मीरा भाईंदर परिसरातील एका लॉजमधून कालावाडिया ताब्यात घेतले. त्याच्याकडून २१ मोबाइल संच, दोन लॅपटाॅप, ११ सीमकार्ड, डेबिट कार्ड, धनादेश पुस्तिका, वेगवेगळ्या कंपनीच्या नावे रबरी शिक्के जप्त करण्यात आले. कालवाडियाला अटक करुन पुण्यातील शिवाजीनगर न्यायालायत हजर करण्यात आले. न्यायालायने त्याला १४ दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

कर चुकविण्यासाठी बनावट कंपन्या

जीएसटी कर चुकवेगिरीसाठी आरोपी कालावाडियाने साथीदार नितीन बर्गे, फैजल मेवावाला, अमित सिंग, जितेंद्र गोहेल, कौशिक मकवाना, राहुल बरैय्या आणि साथीदारांनी कट रचला. जीएसटी कर चुकविण्यासाठी त्यांनी बनावट नावाने २४६ कंपन्या स्थापन केल्या. ज्यांना कर चुकवायाचा आहे. अशा व्यावसायिकांकडून पैसे घेऊन आरोपींनी बनावट कागदपत्रांद्वारे कर चुकवेगिरी केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. सप्टेंबर २०१८ पासून मार्च २०२४ पर्यंत आरोपींनी शासनाची पाच ते आठ हजार कोटी रुपयांचा कर चुकविल्याचे जीएसटी कार्यालयाकडून देण्यात आलेल्या फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

 

Local ad 1