...

(Permanent houses) पाच हजार कुटुंबांना मिळाले पक्के घर

नांदेड : नांदेड जिल्ह्यात कोरोनाच्या आव्हानाशी हात करत 5 हजार 126 कुटुंबांना पक्के घर मिळाले आहे. “ई-गृहप्रवेशा”च्या निमित्ताने नांदेड जिल्ह्यातही पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात घरकुल लाभधारकांना घरकुलाच्या चाव्या व नमुना 8 प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. Five thousand families got permanent houses in Corona too

देगलूर तालुक्यातील खानापूर येथे एका छोटेखानी समारंभात याचे वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, आमदार मोहन हंबर्डे यांची प्रमुख उपस्थिती होती. नांदेड जिल्ह्यात कोरोनाच्या या आव्हानाशी सामना करत विक्रमी काळात एकुण 5 हजार 126 घरकुले पूर्ण केली. यात प्रधानमंत्री आवास योजना, ग्रामीण, रमाई आवास योजना ग्रामीण, शबरी आवास योजना, पारधी आवास योजना, आदिम आवास योजनेंतर्गत घरकुलांचा समावेश आहे. 20 नोव्हेंबर 2020 ते 5 जून 2021 या अल्प कालावधीत ही घरकुले पूर्ण करण्यात आली. Five thousand families got permanent houses in Corona too

Five thousand families got permanent houses in Corona too
Five thousand families got permanent houses in Corona too

जिल्हाधिकारी कार्यालयात राज्याच्या “ई-गृहप्रवेश” या समारंभात व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व मान्यवर यांच्याशी संवाद साधण्यासाठी जिल्ह्यातील प्रातिनिधीक 8 लाभार्थी उपस्थित होते. यात व्यंकटी गुडमवार, लक्ष्मण बोकारे, चंपती पोहरे, कल्पना पाटोळे, संभाजी देशमुख, शंकर इंगोले, चिमनाजी शेके, शंकर आत्राम या लाभार्थ्यांना जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी चाव्या हस्तांतरीत करण्यात आल्या आहेत. Five thousand families got permanent houses in Corona too

Local ad 1