...

Omicron update | ओमिक्रॉनचा मोठा विस्फोट : राज्यात पाच हजारांहून अधिक कोरोना रुग्ण आढळले

MH टाईम्स वृत्तसेवा Omicron update today | राज्यात आज ओमिक्रॉनचा मोठा विस्फोट झाला.तब्बल 198 रूग्ण आढळून आले आहेत तसेच नियमित कोरोनाबाधितांच्याही संख्येतही मोठी वाढ झाली आहे. राज्यात 5,368 नवे कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत. मुंबईमध्ये 190, ठाणे ४ आणि सातारा, नांदेड, पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात प्रत्येकी एक रुग्ण आढळला आगे. (More than five thousand corona patients found in the state)

 

 

राज्यात गुरूवारी दिवसभरात एकुण 5 हजार 368 नवे कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत तर 1 हजार 193 रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तसेच 22 कोरोनाबाधित रूग्णाचा आज राज्यात मृत्यू झाला आहे. (More than five thousand corona patients found in the state)

 

श्री खंडोबा माळेगाव यात्रा शांततेत पारपाडण्यासाठी पोलिसांनी घेतला “हा” निर्णय

आज अखेर राज्यात 65 लाख 07 हजार 330 कोरोनाबाधित रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्याचं रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.55 टक्के इतके आहे. राज्यात आज अखेर 1 लाख 33 हजार 748 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 1078 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात गुरूवार अखेर सक्रीय कोरोनाबाधित रूग्णांची संख्या 18 हजार 217 इतकी आहे. (More than five thousand corona patients found in the state)

 

Nanded Express। नांदेड-पुणे-नांदेड एक्स्प्रेस हडपसर येथून धावणार ; प्रवाशांसाठी हा निर्णय गैरसोयीचा

 

राज्यात ओमिक्रॉन रूग्णांच्या संख्येत मोठी वाढ होऊ लागली आहे. राज्यात गुरूवारी ओमिक्रॉनचा अक्षरशा: विस्फोट झाला आहे.राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेच्या (NIV) अहवालात तर 198 ओमिक्रॉन रूग्ण आढळून आले आहेत. यातील 30 रूग्णांचा आंतरराष्ट्रीय प्रवासाचा इतिहास आहे. आज आढळून आलेल्या ओमिक्रॉन रुग्णांमध्ये सर्वाधिक 190 रूग्ण एकट्या मुंबईत आढळून आले आहेत. तर ठाणे मनपा 04, सातारा 01, नांदेड 01, पुणे मनपा 01, पिंपरी-चिंचवड 01 या नव्या रूग्णांचा समावेश आहे. (More than five thousand corona patients found in the state)

 

नववर्षाच्या स्वागताचा बेत ठरवत असाल तर गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचना वाचा…

 

राज्यात आज एका ओमिक्रॉन रूग्णाच्या मृत्यूची नोंद झाली. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रूग्णालयात नायजेरियाहून प्रवासाचा इतिहास असलेल्या 52 वर्षाच्या पुरुषाचे 28 डिसेंबर रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. या रूग्णास मागील 13 वर्षांपासून मधुमेहाचा त्रस्त होता. या रूग्णाचा मृत्यू कोविड शिवाय इतर कारणानी ( नाॅन कोविड मृत्यू) झालेला आहे. आजच्या अहवालात या रूग्णास ओमिक्रॉन झाल्याचे निष्पन्न झाले अशी माहिती राज्य आरोग्य विभागाकडून जारी करण्यात आली आहे.

 

राज्यात आजअखेर 450 कोरोनाबाधित रूग्ण झाले आहेत. यातील 125 रूग्णांच्या RTPCR रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने घरी सोडून देण्यात आलेले आहे. (More than five thousand corona patients found in the state)

 

 

राज्यात आजवर आढळलेले ओमिक्रॉन रूग्ण खालील प्रमाणे

मुंबई 327 पिंपरी-चिंचवड 26, पुणे ग्रामीण 18, पुणे मनपा 12, ठाणे मनपा 12, नवी मुंबई 07, पनवेल 07, कल्याण डोंबिवली 07, नागपुर 06, सातारा 06, उस्मानाबाद 05, वसई विरार 03, औरंगाबाद 02, नांदेड 03, बुलढाणा 02, भिवंडी-निजामपूर मनपा 02, लातूर 01,अहमदनगर 01, अकोला 01, मिरा भाईंदर 01, कोल्हापूर 01 असे 450 ओमिक्रॉन रूग्ण राज्यात आढळून आले आहेत. यात 09 विदेशी नागरिकांचा समावेश आहे.

Local ad 1