डेल्टा पल्सने राज्याची चिंता वाढवली ; आरोग्य विभाग म्हणतोय…
मुंबई : कोरोनाचे रुग्ण कमी होत असल्याचे चित्र असतानाच डेल्टा पल्सने राज्याची चिंता वाढवली आहे. कालपपर्यंत राज्यात 65 रुग्ण आढळले होते. त्यात आता ठाणे येथे एका रुग्णाची भर पडली असून, एकूण 66 रुग्ण झाले आहेत. आतापर्यंत 66 रुग्णांपकी 5 जणांचा मृत्यू झाला असून, त्यात 3 पुरुष आणि 2 महिलांचा समावेश आहे. (Five patients died of delta pulse virus) विशेष म्हणजे पाच रुग्णांचे वय 65 वर्षांवपेक्षा अधिक आहे.
दोन मृत्यू रत्नागिरी जिल्ह्यात तर बीड, मुंबई आणि रायगड येथे प्रत्येकी एक रुग्णांचा समावेश आहे. (Two deaths occurred in Ratnagiri district and one each in Beed, Mumbai and Raigad) त्यामुळे चिंता वाढली आहे. दरम्यान, विषाणूने आपली जनुकीय रचना बदलत राहणे, हा विषाणूच्या नैसर्गिक जीवनक्रमाचा भाग असून या संदर्भात जनतेने कोणतीही भिती न बाळगता कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करावे, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागाने केले आहे.
राज्यात 66 डेल्टा प्लस विषाणुची लागण झाल्याचे रुण आहेत. (The state has 66 Delta Plus viruses) त्यात आज राष्ट्रीय विषाणू विज्ञान प्रयोगशाळेने ठाणे जिल्ह्यातील 1 डेल्टा प्लस रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे राज्यात आतापर्यंत आढळलेल्या डेल्टा प्लस रुग्णांची संख्या 66 झाली आहे. ठाणे जिल्ह्यातील या 50 वर्षीय महिलेला 22 जुलै 21 रोजी सौम्य स्वरुपाचा कोरोना झाला होता. त्यातून ती बरी झाली आहे. (The 50-year-old woman from Thane district had a mild corona on July 22. She has recovered from it.) या जनुकीय क्रमनिर्धारण तपासणीतून राज्यात 80 टक्केहून अधिक नमुन्यांमध्ये डेल्टा व्हेरियंट आढळत असल्याचे दिसून येते आहे.
प्रत्येक जिल्ह्यातून 100 नमुन्यांची तपासणी
कोरोना प्रतिबंध आणि नियंत्रण उपाययोजनेसाठी कोरोना विषाणूचे जनुकीय क्रमनिर्धारण (जिनोमिक सिक्वेंसिंग) केले जाते. जनुकीय क्रमवारी ही सर्वेक्षणात अत्यंत महत्वाची बाब असून, हे जनुकीय क्रमवारी दोन प्रकारे करण्यात येते. त्यात सेंटीनल सर्वेक्षण राज्यातील 5 प्रयोगशाळा आणि 5 रुग्णालयांची निवड करण्यात आली आहे. हे प्रत्येक सेंटीनल सेंटर दर पंधरवडयाला 15 नमुने जनुकीय क्रमनिर्धारणासाठी पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था आणि राष्ट्रीय पेशी विज्ञान संस्थेकडे पाठवले जाते. कौंसिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रीयल रिसर्च संस्थे अंतर्गत काम करणा-या इन्स्टिटयुट ऑफ जिनोमिक्स अँड इंटिग्रेटेड बायोलॉजी या प्रयोगशाळेसोबत करार केला असून, या नेटवर्कद्वारे दर महिन्याला प्रत्येक जिल्ह्यातून 100 प्रयोगशाळा नमुन्यांची तपासणी करण्यात येते. (Inspection of 100 samples from each district)