...

पुणे पुस्तक महोत्सवातून पाच लाख पुस्तकांची विक्री

पुणे  : पुणे पुस्तक महोत्सवाला नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला असून, पहिल्या चार दिवसांत तीन लाखांपेक्षा अधिक नागरिकांनी भेट दिली आहे. या भेटीत नागरिकांनी तब्बल पाच लाख पुस्तके खरेदी केली. त्यामुळे यंदाचा पुणे पुस्तक महोत्सव नागरिकांच्या चांगला पसंतीस उतरला आहे, अशी माहिती पुणे पुस्तक महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे (Pune Book Festival Organizer Rajesh Pandey) यांनी दिली. (Five lakh books sold at Pune Book Festival)

 

खडकवासला मतदारसंघाच्या विकासासाठी तत्पर : आमदार भिमराव तापकीर

राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या वतीने फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित पुणे पुस्तक महोत्सव सुरू आहे. या महोत्सवात नागरिकांना पुस्तकांची पर्वणी मिळत आहे. महोत्सवात तीन भव्य दालनांमध्ये ६०० पेक्षा अधिक स्टॉल्सच्या माध्यमातून विविध विषयांवरील पुस्तके वाचायला मिळत आहे.  सर्व पुस्तकांच्या खरेदीवर १० टक्के सवलत मिळत असल्याने, नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर पुस्तकांची खरेदी करण्यात येत आहे, अशी माहिती महोत्सवाचे मुख्य संयोजक पांडे यांनी दिली.

 

Pune Book Festival । तिसऱ्या दिवशी परीक्षेच्या पूर्वतयारी मार्गदर्शकांपासून ते भक्तीपर कवितेचा आस्वाद

पुणे पुस्तक महोत्सवाची सुरुवात १४ डिसेंबरला झाली. यंदा महोत्सवात २२ भारतीय भाषांमधील सुमारे १२ लाख पुस्तके खरेदीसाठी उपलब्ध आहे. यंदाच्या पुस्तक महोत्सवाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. नागरिकांना एतिहासिक विषयांपासून ते विज्ञान तंत्रज्ञानावर आधारित पुस्तके मिळत आहे. लहान मुलांसाठी मोठ्या प्रमाणावर पुस्तके उपलब्ध आहेत. त्यामुळे पालक आवर्जून पुस्तकांची खरेदी करीत आहेत. या सर्वांचा परिणाम पुस्तक विक्रीवर झाला असून, पहिल्या चार दिवसांत साधारण पाच लाख पुस्तकांची विक्री झाली आहे. त्याचप्रमाणे शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या असून, त्याला पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातील शाळेतील विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळत आहे. त्याचप्रमाणे पुणे बाल चित्रपट महोत्सवात दररोज दर्जेदार चित्रपट दाखविण्यात येत आहे. त्याला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या महोत्सवात लघुपट, ॲनिमेशन चित्रपटानांही चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे आयोजकांनी सांगितले. दररोज सायंकाळी एकापेक्षा एक बहारदार सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण होत आहे. या कार्यक्रमांमध्ये बँड, कवी संमेलन, गायन, नृत्य अशा सर्वांचा समावेश असल्याने, नागरिकांना मेजवानीच मिळत आहे. खाद्य संस्कृतीचा आस्वाद घेण्यासाठी विविध खाद्यपदार्थांचे सुमारे ४० स्टॉल आहेत. त्यामुळे नागरिकांनी सहकुटुंब पुणे पुस्तक महोत्सवाला भेट द्यावी, असे आवाहन  राजेश पांडे यांनी केले आहे.

पुणे पुस्तक महोत्सवात आज बुधवारी १८ डिसेंबर रोजी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान भेट देणार आहेत खास पुणे पुस्तक महोत्सवासाठी धर्मेंद्र प्रधान हे पुण्यात येत असून ते महोत्सवात साहित्यिक आणि शैक्षणिक तज्ञांशी चर्चा करणार आहेत. त्याचप्रमाणे महोत्सवातील विविध भेट देऊन प्रकाशकांशी संवाद साधणार आहे, अशी माहिती महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे यांनी दिली.

Local ad 1