नांदेड : शहरास जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण एक, दोन तर कधी एकही सापडत नव्हता. त्यामुळे नांदेडकरांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. त्यातच रविवारी 5 रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे आता पुन्हा नागरिकांना कोरोनाचे नियम पाळावे लागणार आहेत. (Five corona were found infected in Nanded district)
जिल्ह्यात रविवारी 432 जणांचा कोरोना अहवाल प्राप्त झाला असून, त्यात 5 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 90 हजार 357 एवढी झाली असून, यातील 87 हजार 682 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. आजच्या घडीला 23 रुग्ण उपचार घेत असून 2 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. (Five corona were found infected in Nanded district)
नांदेड जिल्ह्यात भाजपला मोठे खिंडार ; “हा” मोठा नेता जाणार काँग्रेसमध्ये
जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी नागरिकांनी मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर पाळावे तसेच लस घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 652 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्रात 4, कंधार तालुक्यांतर्गत 1 असे एकुण 5 बाधित आढळले आहेत.