...

बारुळ येथील मानार प्रकल्पातील मासे पोहोचतायेत महानगरांत

कंधार : तालुक्यातील बारूळ येथे निम्न मानार प्रकल्पातील  (Lower Manar Project) गोड पाण्यातील मच्छीला (मासे)  मोठ्या प्रमाणात मागणी असते. आता ही मासे थेट देशातील प्रमुख महानगरांत पोहोच आहे. (Fish from the Manar project at Barul reaches the metropolis)

 

 

 

कंधार तालुक्यात (Kandahar Taluka) गेल्या दोन वर्षांपासून मोठ्याप्रमाणात पाऊस झाल्याने तालुक्यातील नदी-नाले, विहीरी,बंधारे, तलाव तसेच लिंबोटी धरण आणि बारुळ धरण पूर्ण क्षमतेने भरले  आहे. त्यामुळे प्रकल्पात मच्छी बिजाचे उत्पन्न चांगल्या प्रकारे निघत असल्याने विविध जातींच्या मच्छीचे बिज सोडले आहे. या धरणात जवळपास सात ते आठ जातीचे मच्छी चे बिज टाकण्यात आले आहे. तसेच झिंग्याची बिज टाकण्यात आल्याने या धरणातून सध्या एकदिवसा आड मासेमारी केली जात असून, आठ ते दहा क्विंटल मासे निघत आहेत.  (Fish from the Manar project at Barul reaches the metropolis)

धरणातील गोड पाण्यातील मच्छीला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. रहु, मिरगल, कत्तला, शेंगळ,वाम, मरळ, गुंगाळी, पांपलेट, चांभारी, पतोला, सिफरनस, झिंगा,बळव आदी प्रजातीचे मासे मुंबई, अमृतसर, कोलकता शहरांमध्ये पाठविले जात आहे. (Fish from the Manar project at Barul reaches the metropolis)

संभाजी हसनवाड, मासेमार

 कंधार येथे मासे पॅकींग करुन नांदेड येथून रेल्वेने मुंबई कलकत्ता पंजाब,अमृतसर या ठिकाणी पार्सल पाठविली जाते. कलकत्ता येथे गुंगाळी, चांभारी, बळव, कत्तला, शेंगळ ही मासे तर मुंबई येथे रहु, मिरगल कतला,पापलेट तर पंजाबमधील अमृतसर येथे वांबट आणि मरळ प्रजातीची माजे पाठवले जात आहे. मुंबई येथे पाठविली जाणारे मासे दुसऱ्या दिवसी तर कलकत्ता आणि मृतसर येथे चार दिवसांनंतर पोहोचत आहे. (Fish from the Manar project at Barul reaches the metropolis)

Local ad 1