Certificate Of Kunbi Caste । नांदेड : मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र दिले जात असून, नांदेड जिल्ह्यातील पहिले कुणबी प्रमाणपत्र आज सत्यवान दिगंबरराव अंभोरे (Satyawan Digambarao Ambhore) यांना देण्यात आले. (First certificate of Kunbi caste distributed to Satyawan Ambhore in Nanded)
माजी न्यायमूर्ती शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मार्गदर्शनानुसार नांदेड जिल्ह्यातील पहिले कुणबी जातीचे ओबीसी प्रर्वगाचे प्रमाणपत्र देण्यात आले. सत्यवान दिगंबरराव अंभोरे यांना उपजिल्हाधिकारी विकास माने यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आले.
यावेळी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष माधवराव पाटील देवसरकर, पदाधिकारी संकेत पाटील, श्याम कोकाटे, सदानंद पुयड, सुभाष कोल्हे उपस्थित होते.