पुणे. लक्ष्मी पुजनानिमित्त (Lakshmi Puja) शहरात मोठ्या प्रमाणात फाटके वाजविण्यात आली आहेत. शुक्रवारी सांयकाळी 7 वाजल्यापासून ते शिनिवारी सकाळी 7 वाजेपर्यंत फटाक्यांमुळे आगीच्या 35 घटना घडल्या आहेत. या सर्व आगीच्या घटना किरकोळ होत्या. या घटनांमध्ये कोठे ही जखमी वा जिवितहानी नाही, अशी माहिती अग्नीशमन दल्याच्या (Pune Fire Brigade) वतीने देण्यात आली आहे. (Fire incidents at 35 places in twelve hours in Pune)
दिवाळीमध्ये फटाके फोडल्यामुळे आगीच्या घटना घडत असतात. त्यामुळे पुणे महापालिकेच्या अग्नीशमन दलाने जागो-जागी जनजागृती केली आहे. शुक्रवारी लक्ष्मी पूजनानिमित्त मोठ्या प्रमाणात फटाके फोडले जातात. गेल्या बारा तासांत म्हणजेच शुक्रवारी सायंकाळी सात वाजल्यापूसन ते शनिवारी सकाळी 7 वाजेपर्यंत 35 घटनांची नोंद अग्नीशमन दलाकडे झाली आहे. (Fire incidents at 35 places in twelve hours in Pune)
कुठे घडल्या आगीच्या घटना..
१) रात्री ०७•३५ – कळस येथे रस्यावर कचरा पेटला (धानोरी अग्निशमन केंद्र वाहन)
२) ०७•३६ – मांजरी, मोरे वस्ती येथे ऊसाच्या शेतामध्ये आग (हडपसर अग्निशमन केंद्र, एक वॉटर टँकर)
३) ०८•०५ – बालेवाडी फाटा, काका हलवाई स्वीट समोर वायर पेटली (पाषाण अग्निशमन केंद्र वाहन)
४) ०८•०६ – कोथरुड, रामबाग कॉलनी येथे झाडाला आग (कोथरुड अग्निशमन केंद्र वाहन)
५) ०८•१२ – मार्केटयार्ड, गेट क्रमांक पाचजवळ कचरयाच्या वाहनामधील कचरा पेटल्याने आग (गंगाधाम अग्निशमन केंद्र वाहन)
६) ०८•१९ – सहकारनगर पोलिस चौकीजवळ नारळाच्या झाडाला आग (जनता अग्निशमन केंद्र वाहन)
७) ०८•२२ – मंगलदास रस्ता येथे झाडाला आग (नायडू अग्निशमन केंद्र वाहन)
८) ०८•२४ – गणेश पेठ, बुरुड आळी येथे ताडपञी पेटल्याने आग (मध्यवर्ती अग्निशमन केंद्र वाहन)
९) ०८•३० – काञज, संतोषनगर येथे इमारतीच्या गॅलरीमध्ये आग (काञज अग्निशमन केंद्र वाहन)
१०) ०८•३४ – रविवार पेठ, तांबोळी मस्जिद नजीक कपड्याच्या दुकानात आग (कसबा अग्निशमन केंद्र वाहन)
११) ०८•३८ – बी टी कवडे रस्ता, भारत फोर्ज कंपनी समोर एका ट्रकला आग (बी टी कवडे रोड अग्निशमन केंद्र वाहन)
१२) ०८•४० – लक्ष्मी रोड, विजय टॉकीज जवळ घरामध्ये आग (मध्यवर्ती अग्निशमन केंद्र वाहन)
१३) ०८•४५ – कळस स्मशानभूमी जवळ एका शेतामध्ये आग (धानोरी अग्निशमन केंद्र, येरवडा अग्निशमन केंद्र वाहन)
१४) ०८•५४ – टिळक रस्ता, महाराष्ट्र मंडळ शेजारी झाडाला आग (मध्यवर्ती अग्निशमन केंद्र वाहन)
१५) ०९•०१ – सिहंगड रोड, नवश्या मारुती जवळ घरामध्ये आग (सिहंगड रोड अग्निशमन केंद्र वाहन)
१६) ०९•०३ – औंध, बीआरटीएस रस्ता येथे घरामध्ये आग (औंध अग्निशमन केंद्र वाहन)
१७) ०९•११ – गणेश पेठ, डुल्या मारुती मंदिराजवळ छोट्या गोडाउनमध्ये आगीची घटना (कसबा अग्निशमन केंद्र, मध्यवर्ती अग्निशमन केंद्र वॉटर टँकर)
१८) ०९•२३ – वडगाव बुद्रुक, गोसावी वस्ती येथे घरामध्ये आग (पीएमआरडीए अग्निशमन वाहन)
१९) ०९•२५ – कल्याणीनगर, गोल जिम चौक येथे मोकळ्या मैदानात आग (नायडू अग्निशमन केंद्र वाहन)
२०) ०९•२९ – गणेश पेठ, बुरुड आळी येथे पुन्हा ताडपञीला आग (मध्यवर्ती अग्निशमन केंद्र वाहन)
२१) ०९•३५ – चंदननगर, खराडी बायपास येथे कचरा पेटला (येरवडा अग्निशमन केंद्र वाहन)
२२) ०९•४० – शिवणे, दांगट पाटील नगर येथे कपड्याच्या गोडाऊनमध्ये आग (कोथरुड, वारजे, एरंडवणा, काञज, नवले अग्निशमन केंद्र वाहन व दोन वॉटर टँकर)
२३) ०९•४२ – पदमावती, पंचवटी मिञ मंडळ येथे गॅलरीमधे आग (गंगाधाम अग्निशमन केंद्र वाहन)
२४) ०९•५५ – सासवड रोड, सोनाई गार्डन जवळ पीव्हीसी पाईप गोडाऊनला आग (कोंढवा बुद्रुक व टँकर आणि काळेपडल अग्निशमन केंद्र वाहन)
२५) १०•०१ – गंज पेठ, महात्मा फुले वाड्यानजीक कचरा पेटला (मध्यवर्ती अग्निशमन केंद्र वाहन)
२६) १०•०२ – हडपसर, डिपी रस्ता कचरा पेटला (बी टी कवडे रोड अग्निशमन केंद्र वाहन)
२७) १०•२७ – बिबवेवाडी, अप्पर डेपो येथे मोकळ्या मैदानात कचरा पेटला (गंगाधाम अग्निशमन केंद्र वाहन)
२८) १०•३४ – रास्ता पेठ, आयप्पा मंदिरा जवळ इमारतीत गॅलरीत आग (मध्यवर्ती अग्निशमन केंद्र वाहन)
२९) १०•५१ – खराडी, थिटे वस्ती येथे घरामध्ये आग (येरवडा अग्निशमन केंद्र व वॉटर टँकर)
३०) ११•०७ – कोथरुड, हॅप्पी कॉलनी येथे टपरीला आग (जनता अग्निशमन केंद्र वाहन)
३१) ११•४५ – गंगाधाम, आई माता मंदिराजवळ कचरा पेटला (गंगाधाम अग्निशमन केंद्र वाहन)
३२) ०२.५० – हडपसर, रामटेकडी, आंबेडकर नगर लाकडांना आग (हडपसर अग्निशमन केंद्र वाहन)
३३) ०३.०१ – कॅम्प, पुलगेट बसस्टॅाप, सोलापुर बाजार कचरयाला आग (पुणे कॅन्टोमेंट व मध्यवर्ती अग्निशमन केंद्र वाहन)
३४) ०५.०० – कोंढवा खुर्द,नवाजी चौक, मक्का मश्जिद जवळ बंद घराला आग (कोंढवा खुर्द अग्निशमन केंद्र वाहन)
३५) ०६.३० – वाघोली, नगररोड, क्रोमा शोरूम मागे फ्लॅटमध्ये आग (पीएमआरडीए वाघोली, येरवडा अग्निशमन केंद्र वाहन) (Fire incidents at 35 places in twelve hours in Pune)