तुमच्या तालुक्यातील पैसेवारी किती जाणून घ्या..

नांदेड : नांदेड जिल्ह्यातील खरीप हंगामाची नजर पैसेवारी जाहीर झाल्यानंतर आतामहसूल प्रशासनाने खरिपाची सुधारित पैसेवारी जाहीर केली आहे. यात नांदेड जिल्ह्यातील सर्वच सोळा तालुक्यांची पैसेवारी ५० पैशांच्या आत असल्याचे समोर आले आहे. (Find out the percentage in your taluka) 

 

 

जिल्हा प्रशासनाकडून दरवर्षी खरीप पिकांच्या परिस्थितीबाबत हंगामी, सुधारित व अंतिम पैसेवारी जाहीर केली जाते. यातून पिकांच्या उत्पादकतेचा अंदाज येतो. जिल्ह्यात असलेल्या एक हजार ५६२ गावांत आठ लाख ५४ हजार ७६२ हेक्टर क्षेत्र लागवडीखाली येते. यापैकी यंदा आठ लाख १९९ हेक्टरवर खरिपात पेरणी झाली आहे. या पेरणीक्षेत्रात पेरलेल्या पिकांच्या परिस्थितीचा सुधारित अंदाज रविवारी (दि.३१) सुधारित पैसेवारीवरुन जाहीर करण्यात आली. (Find out the percentage in your taluka)

 

मतदार यादीत नाव समाविष्ट करण्याची विशेष संधी

 

जिल्ह्यातील तालुकानिहाय नजरी पैसेवारी (कंसात गावांची संख्या) नांदेड ४७ (८८), अर्धापूर ४८ (६४), कंधार ४७ (१२६), लोहा ४५ (१२७), भोकर ४९ (७७), मुदखेड ४८ (५५), हदगाव ४८ (१३७), हिमायतनगर ४७ (६४), किनवट ४६ (१९१), माहूर ४६ (९२), देगलूर ४८ (१०८), मुखेड ४८ (१३५), बिलोली ४८(९१), नायगाव ४७ (८९), धर्माबाद ४८ (५६), उमरी ४९ (६२). (Find out the percentage in your taluka)

Local ad 1