Zilla Parishad groups । तुमच्या जिल्ह्यात जिल्हा परिषद गट किती वाढणार जाणून घ्या…

Zilla Parishad groups । पुणे : राज्यातील जिल्हा परिषदांची सदस्य संख्या वाढविण्याबाबत नुकतीच मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. त्यामुळे तुमच्या जिल्ह्यात किती गट वाढणार याविषयी उत्सुकतवा वाढली आहे. राज्यात कोणत्या जिल्ह्यात किती वाढणार हे जाणून घ्या… (Find out how many Zilla Parishad groups will grow in your district …)

 

 

सध्या राज्यातील जिल्हा परिषद सदस्यांची संख्या कमीत कमी 50 व जास्तीत जास्त 75 इतकी आहे. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 मधील कलम 9 (1) मध्ये सुधारणा करून जिल्हा परिषद सदस्यांची संख्या कमीत कमी 55 व जास्तीत जास्त 85 असे करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. या सुधारणेमुळे सध्याची जिल्हा परिषद सदस्यांची संख्या 2000 वरुन  2248 इतकी होईल.  त्याचप्रमाणे पंचायत समिती सदस्यांची संख्या देखील 4000 वरुन 4496 इतकी होईल. (The number of Zilla Parishad members will increase from 2000 to 2248. Similarly the number of Panchayat Samiti members will also increase from 4000 to 4496.)

 

 

राज्य निवडणूक आयोग, जिल्हयातील निर्वाचक गटांतून थेट निवडणूकीव्दारे निवडून दयावयाच्या सदस्यांची संख्या निश्चित करील. तथापि, एखादया जिल्हा परिषदेच्या प्रादेशिक क्षेत्राची लोकसंख्या आणि निवडणूकीव्दारे भरवण्यात येणार्‍या अशा जिल्हा परिषदेमधील जागांची संख्या यामधील प्रमाण, शक्य असेल तेथवर, राज्यभर सारखेच असेल. पंचावन्न निर्वाचक गटांची किमान संख्या, राज्यातील  जिल्हयांमधील कमी लोकसंख्या असलेल्या जिल्हयांसाठी नियतवाटप करण्यात येईल.

 

 

 राज्यातील जिल्हयामधील सर्वात अधिक लोकसंख्या. वाय म्हणजे  राज्यातील जिल्हयामधील सर्वात कमी लोकसंख्या उपरोक्त प्रमाणे लोकसंख्यासूत्राच्या आधारे प्रत्येक जिल्हयामध्ये अतिरिक्त निर्वाचक गटांची संख्या निर्धारित करतेवेळी जर लोकसंख्येचा अपूर्णांक अर्धा किंवा त्यापेक्षा अधिक असेल तर प्रत्येक अतिरिक्त निर्वाचक गटासाठी तो एक निर्वाचक गट असा हिशेबाबत धरण्यात येईल आणि जर तो अर्ध्यापेक्षा कमी असेल तर, तो दुर्लक्षित करण्यात येईल.कलम 9 च्या पोटकलम (1) च्या खंड (क) मध्ये निर्धारित केल्याप्रमाणे, कोणत्याही परिस्थितीत, निर्वाचक गटांची एकुण संख्या 85 निर्वाचक गटांपेक्षा अधिक असणार नाही अशी सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला. (Find out how many Zilla Parishad groups will grow in your district …)

 

Local ad 1