(financial year) नवीन आर्थिक वर्षात विमाना प्रवास महागले (Air travel)

नवी दिल्ली : देशांतर्गत प्रवाशांसाठी नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने (Air travel) विमानतळ सुरक्षा शुल्कात (ASF) केली ४० रुपयांनी दरवाढ केली आहे. याची अंमलबजावणी 1 एप्रिल म्हणजेच नवीन आर्थिक वर्षापासून होणार आहे. (financial year)

नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने विमानतळ सुरक्षा शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतल्याने १ एप्रिलपासून विमान प्रवासासाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. विमानतळ सुरक्षा शुल्काचा (ASF) वापर विमानतळाच्या सुरक्षेसाठी केला जातो. आता एअरपोर्ट सिक्युरिटी फी म्हणून देशांतर्गत प्रवाशांना २०० रुपये द्यावे लागणार आहे. आधी यासाठी १६० रुपये मोजावे लागत होते. तर, आंतरराष्ट्रीय प्रवाशांना १२ डॉलर द्यावे लागतील. हा नियम एक एप्रिलपासून लागू होणार आहे. (financial year)

दोन वर्षांपेक्षा कमी वयाची मुलं, ऑन ड्युटी एअरलाइन कर्मचारी किंवा एकाच तिकीटाद्वारे कनेक्टिंग फ्लाइट पकडणारे प्रवाशी अशा काहींना यात सवलत मिळते. दरम्यान, आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी फी ४.९५ डॉलरवरुन ५.२० डॉलर करण्यात आली होती, आणि आता ही फी १२ डॉलर झाली आहे. यामुळे नक्कीच प्रवाशांना महागाईचा फटका बसणार आहे. (financial year)

Local ad 1