(Financial) नांदेड महापालिकेत आर्थिक चणचण ; रस्ते देखभाल दुरुस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग
पुणे ः नांदेड शहरातील रस्त्यांची दुरावस्था झाली असून, दुरुस्तीसाठी नांदेड-वाघाळा महापालिकेकडे पैसे नाहीत. त्यामुळे रस्त्यांची देखभाल-दुरुस्ती करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शहरातील सुमारे 15 कि. मी लांबिचे नऊ रस्त्यांची दुरुस्ती आणि देखभाल आता सार्वजनिक बांधकाम विभाग करणार आहे. Financial crisis in Nanded Municipal Corporation; Classes to Public Works Department for road maintenance repairs
भाग्यनगर टि पाॅईट ते डाॅ. शंकरराव चव्हाण यांच्या पुतळ्यापर्यंत, आय.टी.ए. काॅलेज ते रेल्वे स्टेशन.गोकूळनगर चौक ते हिंगोली गेट, अण्णा भाऊ साठे चौक ते खालसा हायस्कूल आर. यु. बी. ते देगलूर रोडपर्यंत, विश्रामगृह- पावडेवाडी नाका ते छत्रपती चौक, आयटीआय चौक- शिवाजीनगर-मुथा चौक गोवर्धन घाट ते शिवाजी महाले चौक (मामा चौक) पर्यंतचा मुख्य रस्ता, डिआयजी ऑफीस -भगतसिंह चौक, बाॅम्ब शोध पथक कार्यालय ते मामा चौक आणि मुथा चौक, शिवाजी पुतळा ते रल्वे स्टेशनपर्यंचा रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आले आहेत. Financial crisis in Nanded Municipal Corporation; Classes to Public Works Department for road maintenance repairs
