...

(Finally Sachin Waze was arrested) …अखेर सचिन वाझे यांना अटक

मुंबई : नऊ तास चौकशीनंतर NIA ची कारवाई नुकत्याच पार पडलेल्या विधीमंडळाच्या आधिवेशनात चर्चेत आलेले मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी सचिन वाझे यांना मध्यरात्री (ता.१४) अटक करण्यात आली आहे. (Finally Sachin Waze was arrested)

मुकेश अंबानी यांच्या घराजवळ सापडलेल्या स्फोटकांप्रकरणी ही अटक करण्यात आल्याचे राष्ट्रीय गुन्हे अन्वेशन संस्था (NIA) ने सांगितले. त्यामुळे आता पुन्हा एकदा राज्य सरकार आणि विरोधी पक्षाच्या राजकीय धुरळा उड़ण्याची शक्यता आहे. (Finally Sachin Waze was arrested)


Finally Sachin Waze was arrested
Devendra Fadnavis Sachin Waze-and Anil Deshmukh

नुकतचं पार पडलेल्या विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय आधिवेशनात वाझेंचा मुद्दा गाजला होता. २५ फेब्रुवारी रोजी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील अंटालिया घराबाहेर सापडलेली स्फोटके भरलेली गाडी आणि त्यानंतर मनसुख हिराणी यांचा मृत्यू यावरुन आधिवेशन गाजले होते. (Finally Sachin Waze was arrested)

विधीमंडळात विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची वाझेंचे सीडीआर सादर करत त्यांच्या निलंबन आणि बडतर्फीची मागणी केली होती. परंतू गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्यांची बदली केली. एनआयए कडून सचिन वाझे यांची शनिवारी दिवसभर कसून चौकशी करण्यात आली. त्यानंतर रात्री ११ वाजून ५० मिनिटांनी त्यांना अटक करण्यात आली आहे. (Finally Sachin Waze was arrested)

Local ad 1