RTE admission process । आरटीई अंतर्गत प्रवेश प्रक्रिया कधी सुरु होणार ?
मंत्री नितेश राणे यांच्यावर प्रक्षोभक वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करा अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील यांनी पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेऊन केली आहे. याप्रसंगी पुणे शहर व जिल्हा विद्यार्थी काँग्रेस सरचिटणीस कृष्णा साठे, काँग्रेस कार्यकर्ते सचिन मोरे, बाबा मिसाळ हे उपस्थित होते. (File a case against Minister Nitesh Rane ; Rohan Suravase Patil)
रोहन सुरवसे पाटील म्हणाले की, देशाची एकता, सहिष्णूता आणि अखंडतेला बाधा निर्माण करणारे विभाजनकारी, धार्मिक द्वेष पसरवणारे प्रक्षोभक व चिथावणीखोर वक्तव्य करणाऱ्या, संविधानचा अपमान करणाऱ्या नितेश राणे यांचा आम्ही जाहीर निषेध करतो. देशातील सर्वात जास्त साक्षर असणाऱ्या राज्याची तुलना आपल्या देशाचा शत्रू असणाऱ्या पाकिस्तान या राष्ट्राशी करत केरळ मधील लोकांना दहशतवादी म्हणणे हा लोकशाहीचा, संविधानाचा व केरळातील नागरिकांचा घोर अपमान आहे. असेही सुरवसे पाटील म्हणाले. (File a case against Minister Nitesh Rane ; Rohan Suravase Patil)
वाल्मिक कराडला पुण्यात राहण्यास कोणी मदत केली ; शिवसेनेने केली ‘ही’ मागणी
नितेश राणे यांनी लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी, खासदार प्रियांका गांधी तसेच त्यांना निवडून देणाऱ्या समस्त जनतेचा आणि केरळ या राज्याचा अपमान केला आहे. हा संविधानातील सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य म्हणवल्या जाणाऱ्या मूल्यांवर व सिद्धांतांवर हल्ला असून भारतीय राज्यघटनेची पायमल्ली आहे. केरळ राज्यातील नागरिकांचा हा घोर अपमान आहे, अशी प्रतिक्रिया पुणे शहर व जिल्हा विद्यार्थी काँग्रेस सरचिटणीस कृष्णा साठे यांनी दिली.