धक्कादायक : राज्यात पंधरा हजार अल्पवयीन मुली बनल्या माता, सर्वाधिक बालविवाह परभणीत
पुणे : सध्या राज्याच्या विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असून, (Budget Session of Legislative Assembly) त्यात आमदारांकडून अनेक प्रश्न विचारले जातात. त्याला संबंधित विभागाकडून लेखी उत्तर दिले जाते. राज्यात बाल विवाहा किती झाले आहेत, असा प्रश्न विचारण्यात आला आहे. त्यात दिलेल्या उत्तरात धक्कादायक माहिती समोर आली आहे. (Fifteen thousand minor girls became mothers in the state)
महाराष्ट्रात गेल्या तीन वर्षांत 15 हजारांहून अधिक बालविवाह (Child Marriage) झाल्याची कबुली राज्य सरकारने दिली आहे. विधान परिषदेत एका लेखी प्रश्नाला उत्तर देताना सरकारकडून हा खुलासा करण्यात आला. एवढंच नाही तर 18 वर्षांखालील तब्बल 15 हजार 253 मुली माता बनल्याचीही माहितीही समोर आली आहे. (Fifteen thousand minor girls became mothers in the state)
बालविवाहाची कुप्रथा रोखण्यासाठी 2006 साली बालविवाह प्रतिबंधक कायदा करण्यात आला. पण या कायद्याची अजूनही प्रभावी अंमलबजावणी होताना दिसत नाही. धक्कादायक बाब म्हणजे, बालवयात विवाह झालेल्या 15 हजार 253 मुली या 18 वर्षांखालील माता बनल्याची माहिती हाती आली आहे. (Fifteen thousand minor girls became mothers in the state)
बालविवाह (Child Marriage) चिंतेचा विषय बनला असून, यासाठी प्रशासनाकडून अनेक उपयोजना केल्या जात आहेत. दरम्यान, आता याबाबत महिला आयोगाने देखील पुढाकार घेतला आहे. बाल विवाहामुळे मुलींच्या अंगभूत कौशल्यांवर, ज्ञानावर, सामाजिक सामर्थ्यावर, गतिशीलतेवर आणि एकंदरीत स्वायत्ततेवरही मर्यादा येते. त्या कौटुंबिक हिंसाचार आणि अत्याचाराला बळी पडतात.
बालवधूंना आरोग्य, शिक्षण आणि इतर मुलभूत हक्कांपासूनही वंचित ठेवले जाते. त्यांना शाळेत जाण्यापासून रोखले जाते. त्याचा परिणाम त्यांना आजीवन भोगावा लागतो. बालवधूंना कमी वयातील गर्भधारणा आणि बाळंतपणांमुळे धोकादायक संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो. यामुळे या मुलींना वैद्यकीय त्रासालाही सामोर जावं लागते ज्यामुळे शारीरिक समस्या निर्माण होतात (Fifteen thousand minor girls became mothers in the state)
परभणी जिल्हा बालविवाह लावण्यात राज्यात प्रथम क्रमांकावर असून, परभणी जिल्ह्यात बालविवाहाचे प्रमाण खूपच वाढले आहे. मागच्या सहा दिवसात जिल्ह्यात नऊ बालविवाह रोखले गेले आहेत. बालविवाह मुक्त परभणी अभियानाअंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या चाईल्ड लाईन आणि जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी कार्यालयाच्या संयुक्त पथकाकडून ही कारवाई करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील बालविवाहाचे प्रमाण कमी करण्यासाठी जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी बालविवाह मुक्त परभणी हे अभिमान सुरू केले असून या अभियानांतर्गत चाईल्ड लाईन आणि जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी कार्यालयाचे पथक तयार करण्यात आले आहे. या पथकाकडून बालविवाहाबाबत माहिती मिळाली की तात्काळ कारवाई केली जात आहे. गेल्या आठवड्यात जिंतूर आणि सोनपेठमध्ये एकाच दिवशी पाच ठिकाणी लावण्यात येणारे बालविवाह या पथकाने रोखले.