४०० केव्ही अतिउच्चदाबाच्या वीजवाहिन्यांमध्ये बिघाड ; उद्योग नगरीतील वीज पुरवठा खंडीत

पुणे : पॉवर ग्रीड कॉर्पोरेशनऑफइंडिया लिमिटेडच्या (पीजीसीआयएल) ४०० केव्ही शिक्रापूर -तेळेगाव अतिउच्चदाब वीजवाहिनी (Shikrapur-Telegaon Ultra High Voltage Power Line) तुटल्याने शनिवारी (दि. ८) सकाळी ९ च्या सुमारास पिंपरी-चिंचवड परिसर, शिक्रापूर, उर्से, थेऊर, पेरणे (Pimpri-Chinchwad, Shikrapur, Urse, Theur, Perne) आदी परिसरातील ग्राहकांचा वीजपुरवठा बंद पडला. (Fault in 400 KV Extra High Voltage Power Lines)

 

 

दरम्यान विजेची मागणी कमी असल्याने भार व्यवस्थापनाद्वारे पर्यायीव्यवस्थेतून वीजपुरवठा करण्याचे प्रयत्न महावितरणकडून युद्धपातळीवर सुरु आहेत. तर काही भागात नाईलाजास्तव चक्राकार पद्धतीने भारनियमन करावे लागत आहे.

PSI Success Story । सालगड्याचा पोरगा पीएसआय झाला अन् गावकऱ्यांनी काढली गावात मिरवणूक

पीजीसीआयएलच्या शिक्रापूर ते तळेगाव ४०० केव्हीच्या अतिउच्च दाब चार पैकी एक वीज वाहिनी तळेगाव एमआयडीसी जवळ आज सकाळी ९.०३ वाजता तुटली. त्यामुळेसुमारे ३५५ मेगावॅट विजेचे वहन ठप्प झाले. परिणामी पिंपरी गाव, रहाटणी, पिंपळे सौदागर, काळेवाडी, चिंचवड गाव, वाल्हेकरवाडी, रावेत, देहू रोड, खराडी, जुना मुंढवा,थिटेवाडी, थेऊर, पेरणे, शिक्रापूर, कोरेगाव भिमा, सणसवाडी, कोरेगाव मूळ (Pimpri Village, Rahatni, Pimple Saudagar, Kalewadi, Chinchwad Village, Walhekarwadi, Ravet, Dehu Road, Kharadi, Juna Mundhwa, Thitewadi, Theur, Perne, Shikrapur, Koregaon Bhima, Sanswadi, Koregaon Mool) आदी परिसरातील वीज पुरवठा बंद पडला.
पॉवर ग्रीडच्या अतिउच्चदाब ४०० केव्ही वीजवाहिनीच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहे. मात्र त्यास सात ते आठ तास लागण्याची शक्यता आहे. दरम्यान महापारेषण व महावितरणच्या (Mahapareshan and Mahadistribution) संयुक्त प्रयत्नातून भारव्यवस्थापनाद्वारे पर्यायी स्वरुपातवीजपुरवठा उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरु आहे. तर काही ठिकाणी नाईलाजाने चक्राकार पद्धतीने भारनियमन करावे लागणार आहे.

Local ad 1