Fatima Sheikh Google Doodle । गुगलकडून पहिल्या मुस्लिम स्त्री शिक्षिकेला Google Doodle द्वारे अभिवादन

Fatima Sheikh Google Doodle । नवी दिल्ली : सर्च इंजिन गुगलने (Google) आज पहिल्या भारतीय मुस्लीम शिक्षिका फातिमा शेख (Fatima Sheikh) यांच्या जयंतीनिमित्त डुडलमधून (Doodle) अभिवादन केले आहे. महात्मा जोतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यासोबत फातिमा शेख (Fatima Sheikh) यांनी काम केले आहे. फातिमा शेख यांचा जन्म 9 जानेवारी 1831 रोजी पुण्यामध्ये झाला. (Google Doodle Greetings to Female Teacher from Google)

 

 

महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी पुण्यात 1848 मध्ये सुरु केलेल्या पहिल्या शाळेत फातिमा शेख शिक्षिका (Fatima Sheikh teacher) म्हणून कार्यरत होत्या. मुलींच्या शिक्षणासाठी शाळा सुरु केल्यानंतर महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले (Mahatma Phule and Savitribai Phule) यांना घर सोडावे लागले होते. फातिमा शेख (Fatima Sheikh) यांनी सावित्रीबाई फुले यांच्या सहकार्याने शिक्षणाच्या कामाला सुरुवात केली. (Google Doodle Greetings to Female Teacher from Google)

 

 

फातिमा शेख (Fatima Sheikh) यांनी आयुष्यभर समता या तत्वाच्या प्रसारासाठी काम केले. त्यांनी दारोदार जाऊन शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्याचे काम केले. सावित्रीबाई फुले यांच्या प्रमाणं फातिमा शेख (Fatima Sheikh) यांना तत्कालीन समाजातील प्रस्थापित वर्गाकडून त्रास सहन करावा लागला. फातिमा शेख (Fatima Sheikh) यांनी सत्यशोधक समाजाचे देखील काम केले. भारत सरकारनं फातिमा शेख यांच्यांवरील धडा आणि छायाचित्र 2014 मध्ये उर्दू पुस्तकांमध्ये समाविष्ट केला होता. (Google Doodle Greetings to Female Teacher from Google)

Local ad 1