...

(Fashion Street Market,pune) फॅशन स्ट्रीट व शिवाजी मार्केटमधील व्यापाऱ्यांचे पुनर्वसन करा

पुणे ः  अवघ्या पंधरा दिवसांत पुणे कॅन्टोन्मेंंट भागातील दोन मोठ्या बाजारापेठांना आग लागल्याची घटना घडली. त्यात व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले. त्यांना आर्थिक मदत करुन त्यांचे पुनर्वसन करा, अशी मागणी पुणे शहर काँग्रेसने जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख यांची भेट घेऊन केली. (Fashion Street Market,pune)

यावेळी पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे व माजी आमदार मोहन जोशी,  एनएसयुआचे महाराष्ट्र अध्यक्ष अमिर शेख, छ. शिवाजी महाराज मार्केट व्यापारी संघटनेचे अध्यक्ष मंजुर शेख  तसेच छत्रपती शिवाजी महाराज  मार्केट व फँशन स्ट्रीट येथील गाळा धारक उपस्थित होते. (Fashion Street Market,pune)

सन 1990 पासून एम.जी. रोड कॅम्प या ठिकाणी एम. जी. रोड होकर्स अँड पथारे असोसिएशन सेवा संस्थेच्या माध्यमातून अनेक पथारी व्यवसायिक तेथे व्यवसाय करीत आहेत. पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डने अनेक वेळा या किरकोळ विक्रेत्यांवर माल जप्त करून अन्यायकारक कारवाई केली होती. त्यासाठी या पथारी संघटना व पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड मध्ये न्यायालयीन दावे देखील झाले होते व कोर्टाच्या आदेशानुसार ४४८  अधिकृत पथारी वाल्यांना ४ x ५  फोटाचे गाळे  कांबळे मैदान (सध्याच्या फॅशन स्ट्रीट कॅम्प) येथे व्यवसाय सर्व नियमांचे पालन करीत चालू होते. (Fashion Street Market,pune)

Local ad 1