(fashion street market)  फॅशन स्ट्रीटमधील व्यपाऱ्यांना  5 लाखाची तात्काळ मदत करा : कांबळे

पुणे : सर्वसामान्यांच्या हक्काची बाजारपेठ असलेल्या आणि दहा हजार लोकांची उपजीविकेचे साधन असणाऱ्या कॅम्पमधील महात्मा गांधी रस्त्यावरील फॅशन स्ट्रीटला  आग लागून जळून खाक झाले. त्यामुळे हातावर पोट असणाऱ्या छोट्या व्यावसायिकांना शासनाने तात्काळ पाच लाखाची मदत जाहीर करावी, अशी मागणी दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री चे संस्थापक अध्यक्ष पदमश्री मिलिंद कांबळे यांनी केली आहे. (fashion street market)

पुणे कॅम्प येथील जळीत ग्रस्त व्यावसायिकांची भेट घेऊन त्या ठिकाणची कांबळे यांनी पाहणी केली .त्यावेळी त्यांनी ही मागणी केली . (fashion street market)

  जिल्हाधिकारी, पुणे कँन्टोन्मेंटचे अधिकारी यांनी या ठिकाणची पाहणी करून तत्काळ सरसकट सुरुवातीला 5 लाखाची मदत करावी .आणि त्यांनतर सदरील ठिकाणचा सर्व्हे करावे. कारण या मध्ये सर्व छोटे व्यावसायिक हे कष्ट करून येथे अतिशय प्रामाणिक पणे गेली 30 वर्षापासून व्यवसाय करीत आहेत. पुण्याचा वैभवात भर घालणारा असा फॅशन स्ट्रीट हा भाग आहे.

अतिशय माफक दरात आणि अतिशय आधुनिक दर्जाचे कपडे, महिला युवक आणि सर्वच लोकांना सर्व प्रकारचे वस्तू साहित्य येथे मिळत होते. समाजातील अतिशय गरीब आणि उपेक्षित लोक असून त्यांना न्याय मिळाला पाहिजे .त्यासाठी आपण लवकरच पालकमंत्री ,खासदार गिरीश बापट , मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेकडे निवेदन देऊन पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले .(fashion street market)

    यावेळी त्यांनी स्थानिक नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी डिक्कीचे अविनाश जगताप, पुणे शहर अध्यक्ष अनिल होवाळे, एन.जी.खरात, मैत्रिय कांबळे, प्राजक्ता गायकवाड, अमित अवचरे यासह दलीत इंडीयन चेंबर ऑफ कॉमर्सचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. fashion street market)

Local ad 1