(Farmers’stand) थकीत वसुलीसाठी शेतकऱ्यांचा ‘इंडिया मेगा ऍग्रो’ समोर ठिय्या

नायगाव : कृष्णूर येथील इंडिया मेगा ऍग्रो कंपनीने शेकऱ्यांकडून खरेदी केलेल्या शेत मालाची थकीत रक्कम देण्यास टाळाटाळ करत आहे. थकविलेले पैसे वसुल करण्यासाठी शेतकऱ्यांनी गुरुवारी (दि.3) सकाळी ११ वाजता ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत कंपनीच्या प्रेशद्वारवारा समोर शेतकरी जनआंदोलन करत ठिय्या दिला. Farmers’ stand for recovery of arrears

  खरेदी केलेल्या शेत मालाचे पैसे तर नाहीतच पण समाधानकारक उतर पण देण्यात येत नाही. तगादा लावल्यास पैसे मागणाऱ्या शेतकऱ्यावरच गुन्हे दाखल करण्यात येत असल्याने आपल्या हक्काचे पैसे मिळवण्यासाठी पुढील दिशा ठरवण्यासाठी शेतकऱ्यांनी गुरुवारी कंपनीच्या गेट समोर ठिय्या आंदोलन केले.  Farmers’ stand for recovery of arrears

आंदोलक काय म्हणाले.. 

 चार हजार प्रति क्विंटल चे सोयाबीन आता आठ हजार रुपये झाले. कंपनीचे मालक बाहेती म्हणतात तुमचा माल तेंव्हाच विकला तर मग आमचे पैसे काय तुमच्या कंपनीचे बँक कर्ज फेडण्यासाठी वापरले का? नाही तर विकलेल्या मालाचे पैसे कुठे गेले? असा प्रश्न किसान ब्रिगेड चे मराठवाडा अध्यक्ष डॉ दत्ता मोरे यांनी उपस्थित केला. 

 

आम्हाला कंपनीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची इच्छा नाही. मात्र, आम्हांला आमच्या घामाचा दाम हवा आहे. रक्कम मिळवण्यासाठी आम्ही सर्वोतोपरी प्रयत्न करणार आणि पाठपुरावा करणार असल्याचे  रयत क्रांती संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष  पांडुरंग शिंदे यांनी सांगितले.  कंपनीच्या मालकांवर दबाव तयार करून शेतकऱ्यांचे पैसे वसूल करणे, हा आमचा उद्देश आहे. कंपनी व्यवस्थापकाकडे शेतकऱ्यांची प्रमुख मागणी अशी आहे, किती शेतकऱ्यांची पैसेे देणे बाकी आहे, हे जाहीर करावे तसेच रक्कम कधी देणार हे लेखी द्यावे, अशी मागणी  अन्यायग्रस्त शेतकरी समितीचे समन्वयक डॉ. सुरेश कदम यांनी केली.  Farmers’ stand for recovery of arrears


 सामाजिक कार्यकर्ते निळकंठ ताकबीडकर, संभाजी ब्रिगेडचे गजानन पवार होटाळकर, मराठा महासंघ जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पवार, रयत क्रांतीचे  तालुका अध्यक्ष शहाजी पाटील कदम, व्यंकट पाटील, कैलास जाधव यांनीही कंपनी व्यवस्थापनाला जाब विचारला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हिंद युवा परिषदेचे संयोजक रणजित देशमुख यांनी केले यावेळी अन्यायग्रस्त शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.

“इंडिया मेगा कंपनीचे अजय बाहेती यांनी एक प्रसिध्द पत्रक जारी केले. त्यात ते म्हणाले, आजपर्यंत कंपनी शेतकऱ्यासोबतचा व्यवहार सुरळीत होता. यंदा शेतमाल खरेदी करतांना एक ते चार महिण्यापर्यंतचा करार करण्यात आला. परंतु कोरोनाच्या संकटामुळे कंपनीही अडचणीत आली असून, शेतकऱ्यांची पुर्ण रक्कम देण्यास बांधील आहे. दररोज शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी संयम धरावा. कंपणी ८०० ते ९०० शेतकऱ्यांचे १६ ते १७ कोटी देणे आहे. शेतकरी व व्यापारी हे कंपनीचे आधारस्तंभ असून, त्यांना त्रास होवू देणार नाही, अशी ग्वाही दिली आहे.   Farmers’ stand for recovery of arrears

Local ad 1