...

Pune Ring Road Project । पुणे रिंगरोडला जमीन देण्यासाठी शेतकर्‍यांचा विरोध

Pune Ring Road Project । पुणे : पुणे रिंगरोडच्या पूर्वीचा आराखडा बदलून नवीन मूल्यांकन प्रक्रियेनुसार जमिनी संपादित करण्याची अधिसूचना काढण्यात आली आहे. त्यानुसार बाधितांना नोटीस देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. (farmers protest to give land to pune ring road project)

शिवरे (ता. भोर) (Shivare Village , Bhor Taluka , Pune District) गावामधील सुमारे 223 एकर बागायती क्षेत्र (irrigated area) बाधित होत असल्याने येथील शेतकर्‍यांनी आणि इतर गावातील स्थानिक नागरिकांनी याला विरोध केला असून, रविवारी (दि.9जुलै) पुणे-सातारा महामार्गावर (Pune-Satara highway) रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहेत.

 

 

पुणे शहरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळातर्फे (Maharashtra Road Development Corporation) (MSRDC) रिंग रोड प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. त्यानुसार 2022 मध्ये या रस्त्याबाबत एमएसआरडीसी कडून मूल्यांकन प्रक्रिया करून भूसंपादनाची अधिसूचना काढण्यात आली होती. पश्चिम आणि पूर्व असे दोन टप्प्यात रिंग रोड करण्यात येणार असताना प्रथम पश्चिम टप्प्यातील सर्व गावांचे मूल्यांकन करून दर निश्चित करण्यात आले होते. (farmers protest to give land to pune ring road project)

 

 

मूल्यांकन करताना कोरोना काळातील व्यवहार तपासण्यात आल्याने दर कमी असल्याचे कारण देत कोरोना पूर्वीचे व्यवहार तपासून नव्याने मूल्यांकन करण्याचे आदेश देण्यात आले होते. प्रशासनाकडून नव्याने मूल्यांकन करण्यात आले असून मार्गात देखील बदल करण्यात आले आहे, अशी तक्रार भोर आणि मावळ तालुक्यातील स्थानिकांनी मांडली.

 

नवीन अधिसूचनेनुसार शिवरे येथील तब्बल 223 एकर जमीन संपादित करण्यात येणार असल्याचा आरोप करत जाणीवपूर्वक जुने संपादन बदलून नव्याने संपादन केले जाणार आहे. यामुळे शिवरे गावावर अन्याय केला जात असल्याचा आरोप शिवरे ग्रामस्थांनी केला आहे. याबाबत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, जिल्हाधिकारी, संबंधित विभागाचे अधिकारी, मंत्री व राजकीय पदाधिकारी यांना ग्रामस्थांनी निवेदन दिले आहे. याबाबत गावावरचा अन्याय दूर करण्याची विनंती केली आहे परंतु त्यास कोणताही प्रतिसाद नसल्याने शेवटी ग्रामस्थ रास्तारोको आंदोलनाच्या निर्णयावर आले आहेत.

Local ad 1