Nanded news । शेतकऱ्यांनी भरला तब्बल 45 कोटी रुपयांचा विम्याचा हप्ता ; आता भरपाई किती मिळणार ?
नांदेड Nanded news : जिल्ह्यात सहा आणि सात सप्टेंबर दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीपाची पिके पुर्णपणे नष्ट झाली. प्राथमिक नजर अंदानुसार 3 लाख 61 हजार 577 हेक्टर इतक्या पीक क्षेत्राचे नुकसान झाले आहे. (Preliminary estimates of crop damage on an area of 3 lakh 61 thousand 577 hectares) पंतप्रधान पीक विमा योजनेत शेतकऱ्यांनी खरीप हंगाम २०२१-२२ साठी ९ लाख १ हजार ४२० अर्ज सहा पिकांसाठी दाखल केले आहेत. या शेतकऱ्यांनी ४४ कोटी ३९ लाख ५३ हजार २३६ रुपयांचा विमा हप्ता भरला आहे. त्यात पाच लाख १३ हजार अठरा हेक्टर क्षेत्र विमा संरक्षीत केले आहे (Farmers in Nanded district pay crop insurance premium of Rs 45 crore)
नांदेड जिल्हयात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या तलुनेत 107 टक्के पाऊस झाला आहे. (The average sword is 107 percent) जुन 2021 पासून आतापर्यात जिल्हयातील 81 मंडळामध्ये अतिवृष्टी झाली आहे. त्यात प्राथमिक नजर अंदानुसार 3 लाख 61 हजार 577 हेक्टर इतक्या पीक क्षेत्राचे नुकसान झाले आहे.
नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सोयाबीन, मूग, उडीद, तूर, ज्वारी व कपाशी या पिकासाठी पीक विमा भरला आहे. जिल्ह्यात सर्वाधिक सोयाबीन पिकासाठी शेतकऱ्यांनी विमा भरला आहे. यात सोयाबीनसाठी पाच लाख ८५ हजार ७०४ अर्ज दाखल झाले आहेत. तर मुगासाठी एक लाख सहा हजार ८७६, उडीद ९८ हजार १२२, तूर ४४ हजार ६१७, ज्वारी ३४ हजार २१४ व कपाशी ३१ हजार ८८७ अर्ज दाखल झाले आहेत. Farmers in Nanded district pay crop insurance premium of Rs 45 crore)
मागीलवर्षीही जिल्ह्यातील नऊ लाख ५३ हजार अर्जदार शेतकऱ्यांनी ४४ कोटी ४५ लाख रुपयांचा विमा हप्ता भरला होता. यात एक लाख २१ हजार ६०२ अर्जदारांना ९७ कोटी ९१ लाखांचा विमा मंजूर झाला होता.
शेतकऱ्यांसह शासनाचा विमा हप्ता ६३० कोटी पीकविम्यापोटी राज्य व केंद्र शासनाकडून अनुक्रमे २९३ कोटी सहा लाख ४६ हजार ६६१ रुपये असे ५८६ कोटी १२ लाख ९३ हजार ३२२ रुपये व शेतकरी हिस्सा ४४ कोटी ३९ लाख ५३ हजार २६३ रुपये असे एकूण ६३० कोटी ५२ लाख ४६ हजार ५८५ रुपये जमा होणार होते. या योजनेत शेतकऱ्यांची जोखीम रक्कम २ हजार १४५ कोटी ८० लाख ६८ हजार ४७१ रुपये निर्धारित करण्यात आली आहे.
नुकसान झालेले क्षेत्र
अतिवृष्टीमुळे जिल्हयात प्राथमिक नजर अंदानुसार 3 लाख 61 हजार 577 हेक्टर इतक्या पीक क्षेत्राचे नुकसान झाले आहे. त्यामध्ये नांदेड 4407 हे.आर, अर्धापूर 8178 हे.आर., कंधार 45165 हे.आर, लोहा-51900 हे.आर. देगलूर-22788 हे.आर. मुखेड 65078 हे.आर., बिलोली 25890 हे.आर. नायगांव 39294 हे.आर. धर्माबाद-2577 हे.आर., उमरी-22064 हे. आर, भोकर 4894 है.आर. मुदखेड 13539 हे.आर. हदगांव-250 हे. आर, हिमायतनगर-21768 हे.आर, किनवट 33785 हे. आर. क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे.
विमाधारक शेतकऱ्यांना मिळणार 25 टक्के रक्कम
जिल्हयातील सर्व तालुक्यांसाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना सन 2021-22 अंतर्गत प्रतिकूल हवामान परिस्थिती अधिसूचना लागू केली आहे. पुर, पावसातील खंड, दुष्काळ आदी बाबींमुळे शेतकर्यांच्या अपेक्षित उत्पन्नामध्ये सरासरी उत्पन्नाच्या 50 टक्के पेक्षा जास्त घट झाल्यास नुकसान भरपाईच्या प्रमाणात विमा धारक शेतकर्यांना 25 टक्के मर्यादेपर्यंत आगाऊ रक्कम देण्याची तरतूद आहे. त्यानुसार जिल्ह्यातील विमाधारक शेतकर्यांना याचा लाभ होणार आहे. (Farmers in Nanded district pay crop insurance premium of Rs 45 crore)