(Rain falls) पेरणी करताय, थोड थांबा… कृषी विभागाने केली महत्वाची सूचना
नांदेड : गेल्या आठ दिवसांपासून राज्यात कमी अधिक प्रमाणात पाऊस पडत आहे, परंतु तो सर्वदूर सारख्या प्रमाणात नसून कोकण सोडून इतर ठिकाणी तुरळक पाऊस पडत आहे. नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी 80 ते 100 मिलिमीटर इतका पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर आणि जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे यांनी केले आहे. Farmers in Nanded district should not sow till 80 to 100 mm of rain falls.
सोयाबीन, तूर, भुईमूग व मका या पिकांच्या नियोजनासाठी पेरणीच्या पूर्वतयारीची कामे करावीत. विदर्भामध्ये भात पिकासाठी रोपवाटिकाची पूर्वतयारी चालू ठेवावी. खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन या पिकांसाठी जमिनीच्या प्रकारानुसार जमिनीची निवड पूर्व मशागतीची कामे करावीत. सोयाबीन, कापूस, तूर, उडीद, मूग, मका या खरीप पीक पेरणीसाठी शेतजमीन नांगरणी व वाखराच्या पाळ्या देऊन तयार करावी. Farmers in Nanded district should not sow till 80 to 100 mm of rain falls.