Diwali : शेतकर्‍यांची दिवाळी होणार गोड ; मिळणार 25 टक्के आगाऊ रक्कम 

Farmers’ Diwali : नांदेड : यंदाचा खरीप हंगाम शेतकर्‍यांसाठी नुकसानिचा ठरला असून, पीक विमा संरक्षण घेतलेल्या शेतकऱ्यांना 25 टक्के आगाऊ रक्कम मिळणार आहे. यात कापूस, तूर, खरीप ज्वारी आणि सोयाबीनचा समावेश आहे. (Farmers’ Diwali will be sweet) ही रक्कम दिवाळीपूर्वी मिळणार आहे, त्यामुळे काही प्रमाणात शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे.

 

 

जुलै महिन्यात पावसाचा खंड पडल्याने पिकाची उत्पादकता कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर 23 जिल्ह्यांतील 39 लाख 94 हजार 282 शेतकर्‍यांना शेतकर्‍यांना मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थितीतील तरतुदीनुसार 25 टक्के आगाऊ रक्कम मिळणार आहे.

 

 

वातावरण बदलाचा यंदाच्या खरीप पिकांना मोठा फटका बसला. हंगामाच्या सुरुवातीला पावसाने हजेरी लावली. त्या भरवशावर लागवडकर्त्या शेतकर्‍यांनी नंतर पावसाचा मोठा खंड अनुभवला. जुलै महिन्यात अपेक्षित पाऊस झाला नाही. परिणामी, सरासरी उत्पादनात 50 टक्क्यांपेक्षा जास्त घट नजरअंदाजाने दिसते. त्या संदर्भातील अध्यादेश जिल्हाधिकार्‍यांकडून काढण्यात आला आहे. पीक कापणी प्रयोगाअंती अंतिम भरपाईचा निर्णय घेतला जातो.  (Farmers’ Diwali will be sweet)

 

 २५% आगाऊ रक्कमेसाठी नांदेड जिल्हयासाठी सोयाबीन पिकाचा समावेश असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर  यांनी स्पष्ट केले. 

 

नांदेड जिल्हयामध्ये 4 लाख 34 हजार 251 हे क्षेत्रावर सोयाबिन पिकाची पेरणी झाली असुन,  जवळपास सर्व शेतकऱ्यांनी सोयाबिनचा विमा उतरवलेला आहे. अतिवृष्टीमुळे सोयाबिन पिकाचे मोठया प्रमाणावर नुकसान झालेले असुन विमा कंपनी व कृषि विभाग नुकसानीचे पंचनामे करत असुन येत्या 3 ते 4 दिवसात पंचनामे पुर्ण करण्यात येणार आहे. नुकसानी प्रमाणे विमा कंपनी इतर पिकांसोबत सोयाबिन पिकाची देखील नुकसान भरपाई शेतकऱ्यांना देणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी करु नये. तसेच शेतकऱ्यांनी काढणीला आलेल्या सोयाबिन पिकाची 15 ऑक्टोबर पुर्वी काढणी करुन घ्यावी. जेणेकरून नंतर येणाऱ्या संभाव्य पावसापासुन पिकाचे नुकसान होणार नाही. असे आवाहन  जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.  (Farmers’ Diwali will be sweet)

Local ad 1