(Teacher) मयत साधन व्यक्तीच्या कुटुंबाला शिक्षकांनी केली साडेतील लाखांची मदत 

नायगाव : मानधन तत्वार काम करत असलेल्या साधन व्यक्तीचे कोरोनाने निधन झाले. त्यामुळे त्यांचा संसार  उघड्यावर आला. मानधन तत्वावर असल्याने अर्थिक परिस्थिती बिकटच होती. त्यामुळे या  कुटुंबाला आर्थिक मदत करण्याचे आवाहन तालुक्यातील शिक्षकांनी केले.  या  आवाहनाला  त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला असून, तीन लाख 68 हजार रुपयांची मदत मयत साधन व्यक्तीच्या पत्नीकडे सुपूर्द करण्यात आली.  (Teacher)

 मुळ गोंदिया जिल्ह्यातील असलेले उमेश पाटील हे नायगाव गटशिक्षण अधिकारी कार्यालयात २०१४ पासून  साधन व्यक्ती म्हणून मानधन तत्वावर कार्यरत होते. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत त्यांना एप्रिलमध्ये कोरोनाचा संसर्ग होऊन त्यांचे निधन झाले. पाटील यांच्या अचानक जाण्याने पत्नी श्रीमती पदमा पाटील, चिमुकले बाळ यश व वृद्ध आईचे छत्र हरवले. त्यामुळे पुढे चिमुकल्यासह जगावे कस असा पेचप्रसंग पदमा पाटील यांच्या समोर उभा राहीला तर आईने म्हातारपणातील आधार गमावल्याने तिही हतबल झाली. (Teacher)

   मयत पाटील यांच्या कुटुंबाला अर्थिक मदतीची गरज असून, आपआपल्या परिने मदत करा, असे आवाहन शिक्षक अशोक पवळे यांनी केले. त्याला शिक्षकांनी प्रतिसाद दिला असून, प्रत्येक शिक्षकाने अर्थिक मदत केली. त्यामुळे तीन लाख ६८ हजार रुपये जमा झाले. ही जमा झालेली रक्कम सोमवारी (३१ मे) पाटील यांच्या पत्नी पद्मा पाटील यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. (Teacher)

Local ad 1