धक्कादायक..! पोर्टेबल साेनाेग्राफी मशीनद्वारे गर्भलिंगनिदान ; पाठलाग करुन पोलिसांनी डाॅक्टर, एजंटला केली अटक

पुणे :  बारामतीमधील माळेगावच्या गोफणे वस्ती येथे  पोर्टेबल साेनाेग्राफी मशीनद्वारे गर्भलिंगनिदान साेनाेग्राफी करणाऱ्या डाॅक्टरसह एजंटाला माळेगाव पाेलिसांनी (Malegaon Pallis) शुक्रवारी अटक केली आहे. त्यांच्याकडून पोर्टेबल साेनाेग्राफी मशीनही जप्त केले आहे. याप्रकरणी बारामती उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डाॅ. महेश जगताप यांनी फिर्याद दाखल केली आहे. (Shocking… Facious Diagnosis by Portable Celebrity Machine)