(Scholarship) परदेश शिष्यवृत्तीसाठी 30 जून पर्यंत मुदतवाढ ः मंत्री धनंजय मुंडे
पुणे : राजर्षी शाहू महाराज परदेश शिष्यवृत्ती योजनेंतर्गत सन 2021-22 या शैक्षणिक वर्षाकरिता विद्यार्थ्यांची निवड करण्यासाठी 30 जून पर्यंत वाढ करण्यात आली आहे, अशी माहिती सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. Extension till June 30 for foreign scholarship: Minister Dhananjay Munde
परदेशी नामांकित विद्यापीठात उच्च शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना 18 जून 2021 पर्यंत मुदत देण्यात आलेली होती, परंतु बहुतांश विद्यार्थ्यांना परदेशातील संबंधित विद्यापीठांकडून कोविडच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे विहित मुदतीत ऑफर लेटर प्राप्त न झाल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी मुंडेंकडे मुदतवाढ देण्याबाबत विनंती केली होती. त्यानुसार धनंजय मुंडे यांनी विभागाला निर्देश देत ही मुदत 30 जून 2021 पर्यंत वाढविण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार आज 30 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. Extension till June 30 for foreign scholarship: Minister Dhananjay Munde