विहिरीचा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच घेताना विस्तार अधिकारी अटकेत

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (Mahatma Gandhi National Rural Enterprise Guarantee Scheme) विहिरीचा प्रस्ताव मंजूर करून अनुदानाची रक्कम तक्रारदार यांना मिळवून देण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच स्वीकारणारा विस्तार अधिकारी (पंचायत) एसीबीच्या जाळ्यात अडकला आहे.