नंदुरबार : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (Mahatma Gandhi National Rural Enterprise Guarantee Scheme) विहिरीचा प्रस्ताव मंजूर करून अनुदानाची रक्कम तक्रारदार यांना मिळवून देण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच स्वीकारणारा विस्तार अधिकारी (पंचायत) एसीबीच्या जाळ्यात अडकला आहे. (Extension officer arrested for taking bribe of Rs 5,000 to approve well proposal)
राज्यातील अकरा उपजिल्हाधिकार्यांच्या बदल्या ; कोणाची कुठे झाली बदली जाणून घ्या
भैय्यासाहेब दिगंबर निकुंभे (Bhaiyasaheb Digambar Nikumbhe) (वय-५३ वर्षे, व्यवसाय-नोकरी, विस्तार अधिकारी (पंचायत), पंचायत समिती, नंदुरबार Panchayat Committee, Nandurbar) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
एसीबीने (ACB) दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार यांचे रनाळे खुर्द तालुका नंदुरबार शिवारातील शेतात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत विहीर मंजुरीचा प्रस्ताव मंजूर करायचा होता. तसेच त्या विहिरीच्या अनुदानाची रक्कम तक्रारदार यांना मिळवून देण्यासाठी भैय्यासाहेब निकुंभे यांनी तक्रारदार यांच्याकडे पाच हजार रुपयांची मागणी केली. दिनांक १९ जून २०२३ रोजी लाचेची रक्कम पंचायत समिती कार्यालयाबाहेरील चहाच्या टपरीवर पंच साक्षीदारा समोर निकुंभे यांनी स्वीकारली. यावेळी आरोपीला अटक करण्यात आली.
ला. प्र. वि. नंदुरबारचे पोलीस उपअधीक्षक राकेश चौधरी (Nandurbar Deputy Superintendent of Police Rakesh Chaudhary), सापळा अधिकारी पोलिस निरीक्षक समाधान महादू वाघ यांच्या पथकाने ही कारवाई केली. या पथकात पोहवा विजय ठाकरे, पोहवा विलास पाटील, पोहवा ज्योती पाटील, पोना संदीप नावाडेकर, पोना देवराम गावित, पोना मनोज अहिरे, पोना अमोल मराठे व चापोना जितेंद्र महाले यांचा सहभाग होता.