खुशखबर.. पुणे म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ

पुणे : गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळाकडून (म्हाडा) पुणे विभागातर्फे साडेपाच हजारांहून अधिक सदनिकांसाठी ऑनलाईन सोडत काढली जाणार आहे. परंतु, ऑनलाईन सोडतीमध्ये कागदपत्रांच्या जाचक अटी पूर्ण करूनही वारंवार अडचणी येत असल्याने अर्जांचे प्रमाण तुलनेने मोठ्या प्रमाणात घटले आहे. 19 हजार अर्ज पात्र झाले असून, तांत्रिक अडचणी लक्षात घेता, अर्जदारांना अर्ज करण्यासाठी 20 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. (Extension of time to apply for Pune MHADA houses)
म्हाडाच्या पुणे विभागातील पुणे, सोलापूर, सांगली व कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये सुमारे 5 हजार 863 सदनिकांच्या सोडतीसाठी 6 सप्टेंबर रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानुसार बुधवारपर्यंत (दि. 27) अर्ज करण्याची मुदत होती. तर अनामत रक्कम भरण्यासाठी 28 सप्टेंबरची मुदत होती. ऑनलाईन अनामत रक्कम भरण्यासाठी 29 सप्टेंबरची तारीख देण्यात आली होती.
अर्जदारांना ऑनलाईन अर्ज करताना अर्जासोबतच बारकोड असलेला रहिवासाचा दाखला तसेच आर्थिक विवरण पत्र आणि इतर कागदपत्र सादर करावयाची आहेत. त्यानंतर उत्पंन्न गटानुसारच अर्जदाराची पात्रता निश्चित करून सदनिकांसाठी ऑनलाईन अर्ज आणि पेैसे भरणा करता येत आहे. तसेच संबंधित ऑनलाईन सोडत कंपनीकडून प्रथम येणार्‍यास प्राधान्य आणि सर्वसाधारण योजनेसाठी (20 टक्के) स्वंतत्र संकेतस्थळांवर जाऊन अर्ज दाखल करायचे असल्याने अर्जदारांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. परिणामी पूर्तता केलेले कागदपत्र वैध ठरविण्यासाठी लागणारा वेळ वेगवेगळे संकेतस्थळ या तांत्रिक अडचणींमुळे नागरिकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.
म्हाडा पुणे विभागाचेे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पाटील यांनी  20 ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ देत असल्याची घोषणा बुधवारी पत्रकार परिषदेत केली.

 

 

 दरम्यान, अर्जदारांना अनामत रक्कम भरण्यासाठी 21 ऑक्टोबर पर्यंत मुदत वाढ देण्यात आली असून स्वीकृती अर्जांच्या प्रारूप यादीची प्रसिद्धी 27 ऑक्टोबरला करण्यात येणार आहे, तर अंतिम यादी 3 नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार आहे. सोडतीमधील यशस्वी व प्रतीक्षा यादीवरील अर्जदारांची नावे म्हा
डाच्या संकेतस्थळावर 9 नोव्हेंबरला सायंकाळी सहा वाजता प्रसिद्ध केले जाणार आहे.
म्हाडाच्या सोडतीसाठी नियुक्त केलेल्या कंपनीकडून सॉफ्टवेअरमध्ये बदल केले जात असले, तरी नागरिकांमध्ये कागदपत्रांची पूर्तता करून अनेक अडचणी निर्माण होत आहे. मागील ऑनलाईन सोडतीमध्ये देखील अनेक तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्या सोडतीमध्ये विजेत्यांना ऑनलाईन सोडत असताना अद्याप ही म्हाडाच्या कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहे. त्यातच या सोडतीमध्ये देखील अशीच परिस्थिती कायम असल्याने अद्याप तांत्रिक अडचणी कायम असल्याने याबाबत पहिले पाढे पंच्चावन्न अशीच परिस्थिती यावेळी पहावयास मिळत आहे.
Local ad 1