ग्रामीण गुंठेवारीचे प्रस्ताव सादर करण्यास मुदतवाढ
नांदेड : महाराष्ट्र गुंठेवारी विकास अधिनियम (नियमाधीन करणे, श्रेणीवाढ व नियंत्रण) अधिनियम 2021 अंतर्गत महाराष्ट्र शासनाने 31 डिसेंबर 2020 पूर्वीचे अनधिकृत भूखंड / अनधिकृत भूखंडावरील बांधकाम नियमाधीन करण्यास मान्यता दिली. (Extension of time for submission of rural gunthewari proposal)
Related Posts
नांदेड जिल्ह्यात महानगरपालिका, नगरपालिका व नगरपंचायत हद्दी अंतर्गत क्षेत्र वगळून उर्वरीत ग्रामीण भागातील दिनांक 31 डिसेंबर 2021 पूर्वी अस्तित्वात असलेल्या वर नमूद केल्याप्रमाणे भूखंडावरील बांधकाम नियमाधीन करण्यासाठी प्रस्ताव दाखल मुदत 31 मार्च 2022 पर्यंत देण्यात आली होती. आता या मुदतीत 30 एप्रिल 2022 पर्यंत मुदतवाढ करण्यात आलेली आहे. (Extension of time for submission of rural gunthewari proposal)